Vidhan Parishad Election 2026: पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर (Vidhan Parishad Election 2026) होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत.
काही दिवसांआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. अशात, या 17 जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. (Vidhan Parishad Election 2026)
पुढील मतदारसंघात होऊ शकते निवडणूक- (Vidhan Parishad Election 2026)
- सोलापूर
- अहिल्यानगर
- ठाणे
- जळगाव
- सांगली-सातारा
- नांदेड
- यवतमाळ
- पुणे
- भंडारा-गोंदिया
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
- नाशिक
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
- अमरावती
- धाराशिव-लातूर-बीड
- परभणी-हिंगोली
- छत्रपती संभाजी नगर-जालना
- नागपूर
10 जागांसाठी 10 उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक बिनविरोध- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली होती. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार होती. 12 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या या 10 जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु 10 जागांसाठी 10 उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये भाजपच्या 6, शिवसेना शिंदे गटाच्या 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आणि शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी) च्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
भाजपच्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी- (BJP Vidhan Parishad Candidate 2026)
- सुनील कर्जतकर
- माधवी नाईक
- संजय भेंडे
- विवेक कोल्हे
- प्रमोद जठार
- प्रज्ञा सातव
शिवसेना शिंदे गटाच्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी- (Shivsena Vidhan Parishad Candidate 2026)
- नीलम गोऱ्हे
- बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी- (Ajit Pawar NCP Vidhan Parishad Candidate 2026)
- झिशान सिद्दीकी
महाविकास आघाडीकडून बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी- (Uddhav Thackeray Candidate Vidhan Parishad Candidate 2026)
- अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
