Vidhan Parishad Election 2026 Eknath Shinde Shivsena: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर अर्ज माघारीची मुदत 4 जूनपर्यंत असणार आहे.

विधान परिषदेच्या जागावाटपावरुन सत्ताधारी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत बैठकांचे सत्र सुरु आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) धक्कातंत्र वापरण्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक (Ravindra Pathak) यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तसेच बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मतांची गोळाबेरीज वाढविण्यासाठी शिवसेनेची ही खेळी सुरु आहे. तसेच रवींद्र फाटक यांच्या जागी उमेदवार म्हणून बविआचे क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याआधी रवींद्र फाटक यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे शिंदेंकडून धक्कातंत्र वापरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. (Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका- (Vidhan Parishad Election 2026)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

आधी कोणती जागा कोणाकडे होती? आणि कोणाकडे किती जागा? (Vidhan Parishad Election 2026)

आधीचे आमदार कोण?-

  • सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
  • अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
  • ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
  • जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
  • सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
  • नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
  • यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
  • पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
  • भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
  • नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
  • अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
  • धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
  • परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
  • छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
  • नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

पुढील मतदारसंघासाठी विधान परिषदेची निवडणूक होणार- (Vidhan Parishad Election 2026)

  1. सोलापूर 
  2. अहिल्यानगर 
  3. ठाणे 
  4. जळगाव 
  5. सांगली-सातारा 
  6. नांदेड 
  7. यवतमाळ 
  8. पुणे 
  9. भंडारा-गोंदिया 
  10. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 
  11. नाशिक 
  12. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली 
  13. अमरावती
  14. धाराशिव-लातूर-बीड
  15. परभणी-हिंगोली
  16. छत्रपती संभाजी नगर-जालना 
  17. नागपूर

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून 
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून 

संबंधित बातमी:

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूका जाहीर; 18 जून रोजी होणार मतदान, पाहा A टू Z माहिती