एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2026: पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story

Vidhan Parishad Election 2026: बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून मी आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होतो.

पुणे : पुणे काँग्रेसचे गटनेते चंदू कदम यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhan Parishad Election 2026)मुंबईतील 'सिल्व्हर ओक' येथे झालेल्या बैठकीबाबत माहिती दिली. या बैठकीत उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतीही चर्चा किंवा सूचना देण्यात आली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.(Vidhan Parishad Election 2026) चंदू कदम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक कशी लढवायची, काँग्रेसकडे किती मते आहेत आणि निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखावी, यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर बोलावण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून मी आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होतो.(Vidhan Parishad Election 2026)

त्यांनी सांगितले की, बैठकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात काही चर्चा झाली असेल, तर त्याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. चंदू कदम यांनी पुढे सांगितले की, सिल्व्हर ओकवरील बैठकीत केवळ निवडणुकीची रणनीती, मतांची गणिते आणि पुढील राजकीय भूमिका यावरच चर्चा झाली. त्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आम्हाला थेट माहिती मिळाली की, श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय बैठकीत चर्चिला गेला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Vidhan Parishad Election 2026)

Vidhan Parishad Election 2026: बैठकीत नेमकं काय घडलं?

आम्हाला मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक कशी लढवायची, काँग्रेसकडे किती मते आहेत आणि निवडणुकीची रणनीती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून मी आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होतो.या बैठकीत आम्हाला उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतीही माहिती किंवा सूचना देण्यात आली नव्हती. शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही चर्चा झाली असेल, तर त्याची आम्हाला माहिती नाही. सिल्व्हर ओकवरील बैठकीत केवळ निवडणुकीची रणनीती आणि पुढील भूमिका यावरच चर्चा झाली. त्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजता आम्हाला थेट माहिती मिळाली की श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Vidhan Parishad Election 2026: काँग्रेस शहराध्यक्ष दीप्ती चौधरींचाही संताप

तर पुणे काँग्रेस शहराध्यक्ष दीप्ती चौधरी यांनी बोलताना म्हटलं की, पुणे विधान परिषद निवडणुकीत उमेदवार माघारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून काँग्रेसला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. खासदार सुप्रिया सुळे यांनी काय भूमिका मांडली याची माहिती आम्हाला माध्यमांतून समजली. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. विधान परिषदेचे उमेदवार श्रीकांत पाटील हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नव्हते, तर ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीत पैशांचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत माघारीचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र नेमके काय घडले, याची कोणतीही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला देण्यात आली नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत काँग्रेसने आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय आणि संवाद अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद? 'अपना टाईम आ गया' म्हणत रोहित पवारांचा कडाडून विरोध!
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद? 'अपना टाईम आ गया' म्हणत रोहित पवारांचा कडाडून विरोध!
भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय, लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा
भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय, लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget