Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीत परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर (Election Withdrawal) कारवाईचा बडगा उगारला आहे.

Vidhan Parishad Election 2026: राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) आता विधान परिषद निवडणुकीत परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर (Election Withdrawal) कारवाईचा बडगा उगारला आहे. यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे (Sahebrao Kamble) आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल (Shailesh Kumar Agrawal) यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
Yavatmal Vidhan Parishad Election 2026: पालकमंत्री संजय राठोड ठरले बिनविरोध निवडणुकीसाठी धुरंदर
यवतमाळ विधान परिषदेची निवडणुकीची चुरस जरी संपली असली तरी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 5 पैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने यातील राजकीय नाट्यमय घडामोडींनी ही निवडणूक राज्यात चांगलीच चर्चेत राहिली. महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे, भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून आणलेला दबाव आणि अजित पवार गटाच्या साजिद बेग, अपक्ष सय्यद फारुख यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिंदे सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध झाले. या सर्व राजकीय घडामोडी जुळून आणण्यासाठी धुरंदर म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाहिले जाते.
Congress : साहेबराव कांबळेच्या माघारमागे ठाण्यातील 'नंदनवन' कारणीभूत ठरल्याची चर्चा
महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी 3 जूनला आपला अर्ज मागे घेतला. यामागे ठाण्यातील 'नंदनवन' कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. मात्र पुरेसे मतदार नसल्याचे कारण सोमर दाखवीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून सय्यद फारूक यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला. तर भाजपचे बंडखोर नितीन पुतळा यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची धावती भेट घेतली आणि वेट आणि वॉच भूमिका घेण्यास सांगितले. शेवटी अर्ज मागे घेण्याच्या काही क्षणाआधी माजीमंत्री मदन येरावार यांच्या सोबत येत युती धर्माची आठवण येत उमेदवारी मागे घेतली.
Yavatmal News : साहेबराव कांबळे यांच्या विरोधात माविआचं आंदोलन, लोकशाहीची थट्टा आणि पैसे फेकून विरोध
साहेबराव पवार यांच्या उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार सय्यद फारुख याला महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या घरी सर्व काँग्रेसच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली. ही बैठक सुरू असतानाच सय्यद फारूक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तर महायुती मधीलच घटक पक्ष असलेले अजित पवार गटाकडून साजिद बेग यांनी सुद्धा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या आदेशावरून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. साहेबराव कांबळे यांच्या उमेदवारी मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडनं यवतमाळच्या दत्ता चौकात त्यांच्याविरुद्ध आंदोलन ही करण्यात आले लोकशाहीची थट्टा आणि पैसे फेकून विरोध दर्शविण्यात आला.
उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या तासापर्यंत ज्या राजकीय घडामोडी घडल्या की घडवून आणल्या हा जरी चर्चेचा विषय असला तरी ही निवडणूक राजकीय धुरंदर बनलेले पालकमंत्री संजय राठोड यांच्यामुळेच बिनविरोध झाल्याचे चर्चा मात्र जिल्हाभरात सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















