Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाने अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत मतभेद उफाळून आल्याचे चित्र समोर आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरुवातीला विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता काँग्रेसने भूमिका बदलत विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र, अंबादास दानवेंना पाठिंबा देताना काँग्रेसने महाविकास आघाडी समोर एक मोठी अट ठेवली आहे. 

Continues below advertisement

Harshvardhan Sapkal: ठाकरेंचा निर्णय महाविकास आघाडी म्हणून मान्य : हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपची भूमिका ही संविधान विरोधी भूमिका आहे. ⁠फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विरोधातील भाजपची भूमिका आहे. यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. ⁠राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवले. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, अशी सर्वांची भूमिका होती. मात्र, मी परत विधान परिषदेवर जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. सोनिया गांधी यांनी जसे पंतप्रधान होणार नाही, अशी भूमिका घेतली. तशीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. यात ⁠कोणाचा अनादर नाही. ⁠त्यांनी घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून आम्ही मानतो, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे हेच उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसची मविआसमोर मोठी अट  

दरम्यान, काँग्रेसने अंबादास दानवे यांना कोणत्या मुद्यावर पाठिंबा दिला? याबाबतची माहिती देखील समोर आली आहे. आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. तर विधान परिषदेची एक जागा ठाकरे गटाला देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Continues below advertisement

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026

उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026

मतदानाची तारीख: 12 मे 2026

मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.

मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 

विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
  • नीलम गोऱ्हे (शिवसेना)
  • शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
  • अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
  • गोपीचंद पडळकर (भाजप)
  • रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
  • राजेश राठोड (काँग्रेस)
  • प्रवीण दटके (भाजप)
  • रमेश कराड (भाजप)

विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)

  • प्रज्ञा सातव

भाजपकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (BJP Candidate Vidhan Parishad Election 2026)

  • सुनील कर्जतकर 
  • माधवी नाईक 
  • संजय भेंडे
  • विवेक कोल्हे
  • प्रमोद जठार
  • प्रज्ञा सातव

शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (Shivsena Candidate Vidhan Parishad Election 2026)

  • नीलम गोऱ्हे
  • बच्चू कडू

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (NCP Ajit Pawar Candidate Vidhan Parishad Election 2026)

  • झिशान सिद्दीकी

महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (MVA Candidate Vidhan Parishad Election 2026)

  • अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.

आणखी वाचा 

Eknath Shinde On Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेतूनच नावाला विरोध, तरीही विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; एकनाथ शिंदे म्हणाले, मालकांचा...