Veteran Singer Asha Bhosle Passed Away : गेल्या सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर आपल्या जादुई आणि सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या, मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे आज (12 एप्रिल 2026 रोजी) निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वविख्यात गायिका, तब्बल 20 हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी रेकॉर्ड करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये मानाचे पान रचलेल्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना काल श्वसनाचा त्रास झाल्यानंतर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची आज प्राणज्योत मालवली. आशा ताईंच्या निधनाने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अशातचत्यांच्यायानिधनाच्याबातमीनेसर्वच क्षेत्रातशोककळापसरलीआहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) आशा ताईंच्या निधनाच्याबातमीनंतरआठवणींनाउजाळादेत आशाताईंचे आवडलेले गाणं सांगितलंय, तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharatshet Gogawale) हेदेखील गहिवरले आहे.
Shahaji Bapu Patil: महाराष्ट्राचं वैभव आज अस्ताला गेलंय
आशादीदींचं निधन होणं ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद घटना आहे. लता दीदी आणि आशा दीदी या दोन बहिनींनी सर्वच प्रकारची आणि जवळजवळ सर्व भाषेत सुरेल अशी गाणी गायली. सुरेल गाण्यातून त्यांनी लोकांची करमणूक केलीच, शिवाय सर्वच भाषीय गाणी, भजन, गाऊन अध्यात्मिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. आशा दीदींचा आवाज खास करून किशोर कुमार सोबत ऐकायला मिळाला. कारण त्यांच्या आवाजात नाचगाण्याची लय होती. एक महाराष्ट्राचं वैभव आज अस्ताला गेला आहे. जगभरतील त्यांचा चाहता वर्ग या घटनेनं दुःखी झाला आहे. माझ्याकडून आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. या सोबतच त्यांनी 'पिया तू अब तो आजा' आवडतं गाणं असल्याचेही सांगितलं.
Bharatshet Gogawale : या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झालाय
आशा भोसले यांचे निधन झाल्याची अतिशय दुःखद बातमी कळली, या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. कारण मंगेशकर कुटुंबीयांच्या घरात जन्मलेल्या लतादीदी असतील किंवा आशादीदी असतील, या संपूर्ण कुटुंबाशी महाराष्ट्राचं एक नातं राहिलं आहे. मी त्यांच्या दुःखात सहभाग आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचे कुटुंबाचं सात्वन करण्यासाठी जातील, आम्ही देखील त्यांच्या दुःखात सहभाग होऊन आशा दीदींच्या आत्म्याला शांती लाभो, यासाठी प्रार्थना करतोय. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली.
