एक्स्प्लोर

Harshwardhan Sapkal on Tipu Sultan: हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला सवाल, म्हणाले, 'सावरकरांनी शिवरायांच्या सज्जनपणाला विकृत म्हटलं, ते कसं चाललं?'

Harshwardhan Sapkal on Tipu Sultan: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान वादाबाबत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. त्यांनी सावरकरांच्या 'सहा सोनेही पाने' या पुस्तकाचा उल्लेख केला

Harshwardhan Sapkal on Tipu Sultan and Chhtrapati Shivaji Maharaj: भाजपला संविधान बदलायचे आहे. त्यामुळे भाजप संविधानातील महापुरुषांविषयी कायमच आक्षेप घेत आला आहे. टिपू सुलतानाबाबतही भाजपचे (BJP) हेच धोरण आहे. देवेंद्र फडणवीस टिपू सुलतानाच्याविरोधात इतकं पोटतिडकीने बोलतात. पण राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी फडणवीस आणि बावनकुळेंच्या सभा असलेल्या ठिकाणी स्टेजच्या बॅकड्रॉपला टिपू सुलतानाचे (Tipu Sultan) चित्र होते. उद्या टिपू सुलतानाच्या वंशजांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजप त्यांनाही मोठी पदे देईल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केली. त्यांनी सोमवारी बुलढाणा येथे 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या तुलनेबाबत आपली बाजू सविस्तरपणे मांडली. 

'सहा सोनेरी पाने' या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल खूप चुकीचे लिहले आहे. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस सावरकर यांनी केले आहे. 'स्वराज्य हे स्थापन होणारचं होतं. पण कावळा बसायला आणि डांग तुटायला, त्याप्रकारे शिवाजी महाराज आले', असे सावरकरांनी त्या पुस्तकात लिहले आहे. असं लिहणारे सावरकर भाजपला चालतात. गोंधळ निर्माण करणे हे भाजपचे धोरण आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

शिवाजी महाराज अद्वितीय आहेत, त्यांचं एकंदरित कार्य आणि कर्तृत्व अद्वितीय आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. मी त्यांच्याविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. मला दोन वेगवेगळ्या कालखंडातील महापुरुषांबद्दल  प्रश्न विचारण्यात आला, त्या संदर्भाने मी बोललो. राज्यात दिवसेंदिवस जाती-धर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व महापुरुषांचे फोटो समकक्ष पातळीवर लावावेत, अशी मागणी आहे, त्याबाबत मला मत विचारण्यात आले होते. त्या अनुषंगाने मी ते वक्तव्य केले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विचार दिला, ते बहुजनांचे हिरो आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतानाने कार्य केले. त्यामुळे दोघांचा फोटो सोबत लागला तर हरकत नाही, असे मी म्हटले होते. यामध्ये मी कुठेही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. पण माझ्या वक्तव्याबाबत 'ध' चा 'मा' करण्यात आला, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Harshwardhan Sapkal on BJP: भाजपला संविधान बदलायचे आहे: हर्षवर्धन सपकाळ

भारताच्या संविधानात प्रकरण 16 मध्ये प्रशासनाचा भाग सुरु होतो तिथे टिपू सुलतान आणि झाशीच्या राणीची प्रतिमा आहे. त्या चित्राच्या अनुषंगाने प्रशासनाचा मसुदा लिहला आहे. देशाच्या जडणघडणीत ज्या व्यक्तींचं योगदान आहे, त्या व्यक्तीचं चित्र आपल्या संविधानात आहे. भाजप याविरोधात बोलतच राहणार. कारण भाजपला संविधान बदलायचे आहे. त्यामुळेच संविधानातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचा आक्षेप आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

आणखी वाचा

शिवरायांची टिपू सुलतानासोबत तुलना, भाजप आक्रमक होताच हर्षवर्धन सपकाळांनी सावरकरांचं 'ते' वक्तव्य बाहेर काढलं, म्हणाले...

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
Ajit Pawar: सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
Embed widget