Vasant More: "घोडेबाजार नाही, ही 100% सेटलमेंट!", वसंत मोरेंचा शरद पवार गटावर घणाघात, म्हणाले, 'पुण्यात पाठीत खंजीर खुपसला, मविआतून बाहेर पडा; मी वरिष्ठांना सांगितलंय!'
Vasant More: काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषदेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळली. त्यावर भाजपमधून आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करून विक्रम काकडे (Vikram Kakde) यांनी सर्व निष्ठावंताना डावलून उमेदवारी मिळविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी उमेदवारी माघार घेतली.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील (Shrikant Patil) यांनी नाट्यमय घडामोडीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार माघार घेतली. त्यामुळे पुण्याची विधानपरिषद बिनविरोध झाली, त्यानंतर काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.(Vasant More)
Vasant More: पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मी वरिष्ठ नेत्यांना....
वसंत मोरे यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला आहे, तिसऱ्यांदा हा विश्वासघात झाला आहे. अंकुश काकडे यांचा फॉर्म भरण्यासाठी फोन आला होता, शंभर टक्के सेटलमेंट आहे, भाऊंबदकी आहे. त्यांनी बारामतीत भाऊबंदकी करावी. ठाण्यात मदत केली, म्हणून साताऱ्यात शिवसेनेला मदत करणार, शरद पवार गटाचे शहरात तीन नगरसेवक आहेत, त्यांनी विचार करायला पाहिजे. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला आहे. महाविकास आघाडी कायम राहील की नाही हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मी वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे. शरद पवार गटामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी आतून एक आहेत, ही भाऊबंदकी आहे. याचे सर्व परिणाम महाविकास आघाडीला भोगावे लागतील. घोडेबाजार नाही, सेटलमेंट झाली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर भाऊबंदकी करणार असाल तर महाविकास आघाडीचे वाटोळं होणार आहे, असंही पुढे वसंत मोरेंनी म्हटलं आहे.
NCP VS NCPSP : राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी सामना झालाच नाही
महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा डमी अर्ज म्हणून तुषार कामटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणुक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरूध्द राष्ट्रवादी ( अजित पवार) अशी होणार असल्याचं दिसून येत होतं. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर चक्रं फिरली. श्रीकांत पाटील यांच्यासह तुषार कामठे उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रदीप कंद यांनी भेट घेतली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटे शिल्लक राहिली असता प्रदीप कंद आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची धाकधुक वाढली होती. पण भाजप आमदार राहुल कुल यांच्या सोबत अखेरची काही मिनिट बाकी असताना प्रदीप कंद हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होउन उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?





















