एक्स्प्लोर

Rupali Thombare: वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झालीय का? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी; अजित दादांच्या पक्षातूनच मागणी

Rupali Thombare: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झाली आहे का?, याची चौकशी करा. अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली ठोंबरे यांनी सरकारकडे केली आहे.

Rupali Thombare on Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane Case ) राज्य महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झाली आहे का?, याची चौकशी करा. अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी सरकारकडे केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरर (Rupali Chakankar) आणि आयोगाच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. 

दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असेही रूपाली ठोंबरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितली आहे. महिला आयोगाचा अध्यक्ष हा गैरराजकीय असावा, या चर्चेसंदर्भात सरकारने विचार करण्याची मागणी ही रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. त्या अकोला येथे बोलत होत्या. महिला आयोगावर निवृत्त न्यायमूर्ती किंवा निवृत्त सनदी पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या चर्चेवर सरकारने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही रूपाली ठोंबरे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. मात्र पक्षातील नेत्यांनीच आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात भाष्य केल्याने राष्ट्रवादीतील असंतोष आणखी मिश्र होण्याची चिन्हं असल्याचे बोलले जात आहे.

रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षातून नाराजीचा सुर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट नाराज आहे. हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवरून टीका होत असल्याने पक्षातला एक गट अस्वस्थ असल्याचे ही बोलले जात आहे. परिणामी, पक्षातील नाराज गटाने रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीची तक्रार पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रूपाली चाकणकर यांच्याकडे कोणतंही एक पद ठेवण्याची नाराज गटाची मागणी असल्याचे ही बोलले जात आहे.

रूपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच पक्षाच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद देखील आहे. चाकणकर यांना दोन पैकी एका पदावरून हटवण्याची पक्षातील नाराज गटाची मागणी असल्याचे सांगण्यात येतंय. त्यामुळे आता रूपाली चाकणकर यांच्या पदाबाबत पक्ष काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget