Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांचे वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारमधील एका निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी निधी कसा पुरवला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सुरतस्थित आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी ही मागणी केली आहे. तसेच ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी सीजेपीच्या आंदोलकांसाठी जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तिवारी यांनी या संदर्भात निवडणूक आयोग आणि कर अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नोंदणीकृत संघटना आहे की नाही पडताळणी करावी

तिवारी यांनी म्हटले आहे की, सीजेपी ही नोंदणीकृत संघटना नसून एक राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. ते म्हणाले की, जर 1 कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीचे आश्वासन दिलेगेले असेल, तर निवडणूक आयोगाने सीजेपी ही नोंदणीकृत संघटना आहे की नाही याची पडताळणी करावी. तिवारी यांनी पुढे असेही म्हटले आहे की, जर संघटना नोंदणीकृत नसेल, तर राजकीय पक्षाच्या नावाने कामकाज करणे आणि निधी गोळा करणे हे चौकशीच्या अधीन असू शकते. त्यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाशीही संपर्क साधला आहे. सिबल यांच्या प्रस्तावित योगदानावर जीएसटी लागू होईल का, असे त्यांनी विचारले आहे.

कोण आहेत अभिजित दिपके?

30 वर्षीय अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरमधील डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून सध्या ते अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत बेरोजगारांना उद्देशून काॅकरोच असा उल्लेख केल्यानंतर अभिजित यांनी ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर सोशल मीडियात चळवळ सुरु झाली. या चळवळीचे रुपांतर नीट पेपरफुटीविरोधातील झाले आणि धर्मेंद प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या संपूर्ण मोहिमेत अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक केंद्रस्थानी होते. 

विद्यार्थ्यांच्या कायदेशीर मदतीसाठी निधी उभारला

दरम्यान,  27 जुलै रोजी, कॉकरोच जनता पार्टीने पेपरफुटी प्रकरणानंतर फौजदारी खटल्यांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी कायदेशीर संरक्षण निधी उभारण्याची घोषणा केली. ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी या निधीसाठी 1 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांनी देशभरातील वकिलांना या निधीत योगदान देण्याचे आवाहनही केले. सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आश्वासनांनंतरही देशभरातील विद्यार्थ्यांवर फौजदारी खटले दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संपर्कात आहेत. याप्रसंगी कपिल सिबलही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

सिबल म्हणाले, "मी माझ्या वतीने 1 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. मी देशभरातील वकिलांनाही आवाहन करतो की, पीडितांना मदत करण्यासाठी या निधीमध्ये योगदान द्यावे. कायद्याच्या कथित गैरवापरामुळे पीडित झालेल्यांच्या पाठीशी आमचे वकील उभे आहेत." ते म्हणाले, "भारतात जिथे कुठे शांततापूर्ण आंदोलने झाली आहेत, मग ते बिहार, आसाम, पश्चिम बंगाल किंवा महाराष्ट्र असो, आणि जिथे विद्यार्थी किंवा आंदोलकांना लक्ष्य केले गेले आहे, तिथे दाखल झालेल्या खटल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा स्थापन केली जाईल, जेणेकरून आमचे वकील त्यांना कायदेशीर मदत देऊ शकतील."

विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी एक वेबसाइट तयार केली जाईल 

कपिल सिबल यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाले आहेत, त्यांची माहिती असलेली एक वेबसाईट सरन्यायाधीश तयार करतील. त्यांनी पुढे सांगितले की, ही वेबसाईट विनामोबदला किंवा इतर कोणत्याही प्रकारे मदत करू इच्छिणाऱ्या वकिलांनाही संधी उपलब्ध करून देईल.

इतर महत्वाच्या बातम्या