Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Kolhapur) हेसध्या कोल्हापूर (Kolhapur)आणि इचलकरंजीच्या दौऱ्यावर आहेत. ते रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज (शनिवारी) विविध कार्यक्रम होणार आहेत असूनयावेळी ते महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करतील आणि 'पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास योजने'अंतर्गत मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. दरम्यान, अमित शाह (Amit Shah) कोल्हापूर येथील पोलीस परेड मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर, ते इचलकरंजी येथे 'जनता सहकारी बँके'च्या नवीन इमारतीचे उद्घाटन करतील आणि एका सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार व विस्तारीकरण कार्यक्रमात सहभागी होतील, अशीमाहितीआहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री इचलकरंजी येथील 'कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क'च्या मैदानावर शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही संबोधित करतील.
Amit Shah at Kolhapur : सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेणार, शिंदे- शाहांमध्ये ऑपरेशन टायगरवर चर्चा होणार?
दरम्यान, कोल्हापूरच्या सर्किट हाऊस या ठिकाणी अमित शहा यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तर अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त शनिवारी (दि. 20 जून) अंबाबाई मंदिर परिसरातील सात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी महत्त्वाचे पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला उद्या केंद्रीय मंत्री अमित शाह येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती काम अंतिम टप्प्यात आली आहेत. आज सकाळी 9 वाजता अमित शाह हे अंबाबाई देवीची विधिवत पूजा करून दर्शन घेतील. त्यानंतर अंबाबाई परिसरात सुरू असणाऱ्या 1500 कोटी रुपयांच्या विकास कामांचा ते शिलान्यास करतील. जवळपास तासभर ते अंबाबाई मंदिर परिसरात असणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराचा इतिहास थोडक्यात सांगण्यासाठी काही फलक देखील लावण्यात आलेले आहेत.
Kolhapur News : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी अडवलं, नेमकंकायघडलं?
दुसरीकडे, कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अमित शहा यांना भेटण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीतच अडवलंय. या पदाधिकारी कार्यकर्त्यांना हत्तरगी टोलनाक्यावर अडवण्यात आले आहे. पोलिसांनी याआंदोलकअडवताच एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हत्तरगी टोल नाक्यावर ठिय्या मांडला. यावेळी पोलीस आणि एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद देखीलरंगला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांना सीमा प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच शिष्टमंडळ आज कोल्हापुरात येत होतं. त्यावेळीहाप्रकारघडलाय.
