Union Cabinet Reshuffle 2026: केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात (Union Cabinet Reshuffle 2026) शिवसेनेला (Shivsena) एक कॅबिनेटमंत्रिपद व राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना कॅबिनेटमंत्रिपद दिले जाणार असल्याची खात्रीलायक सूत्राने माहिती दिली आहे. तर राज्यमंत्री पदासाठी नव्याने आलेल्या 6 खासदारांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. (Central Goverment Cabinet Marathi News)
एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर- (Eknath Shinde Shivsena Politics)
एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. एकदिवसीय दिल्ली दौरा करून एकनाथ शिंदे आज रात्री मुंबईत पुन्हा परतणार आहे. आज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होतील. ऑपरेशन टायगर (Opration Tiger) यशस्वी झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत येत आहेत. राज्यातील इतरही काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्व आलं आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती- (Shrikant Shinde Union Cabinet Reshuffle 2026)
पक्ष संघटनेच्या दृष्टीने राज्यमंत्रीपद विदर्भात ठेवायचे की मराठवाड्यात?, यावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चर्चा सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव जेष्ठ खासदार आहेत. संजय जाधव यांच्या माध्यमातून मराठवाड्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. मात्र, शिंदे गटाच्या सर्व खासदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेल्या प्रतापराव जाधव यांना वगळायचं की नाही? यावरून शिंदे यांच्या शिवसेनेत चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव अंतिम झाल्याची सूत्रांची माहिती आहे. श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती आहे.
ठाकरेंचे 6 बंडखोर शिवसेनेत सामील झाल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 वर- (Shivsena MP)
ठाकरेंचे 6 बंडखोर शिवसेनेत सामील झाल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 वर गेलीय. यामुळे खासदारांची सर्वाधिक संख्या असणारा शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे केंद्रात वाढलेलं वजन वाढल्यानं शिवसेनेच्या पदरातही अधिकचं मंत्रिपद पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या खासदारांची नावं- (Shivsena MP Opration Tiger)
- संजय दिना पाटील
- ओमराजे निंबाळकर
- संजय जाधव
- संजय देशमुख
- नागेश पाटील-आष्टीकर
- भाऊसाहेब वाकचौरे
