Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena: कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) मनसेने (MNS) शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणच एकच खळबळ उडाली. सत्तेत असल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही.इतके दिवस केडीएमसीमधे जो खेळ सुरू होताा, तो आम्हाला थांबताना दिसत नव्हता. तो थांबवण्यासाठी आम्ही शिंदेंना पाठिंबा दिला आहे, असं राजू पाटील यांनी सांगितले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आम्ही आमच्या आकड्यांचं गणित सांगितलं. तेव्हा त्यांनी सुचवलं की, तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असंही राजू पाटील म्हणाले. दरम्यान कल्याण-डोंबिवलीतील या ट्विस्टमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. तर कल्याण-डोंबिवलीतील या सगळ्या राजकारणावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. (Raj Thackeray-Uddhav Thackeray)
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवकांना धीर दिला. तसेच तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. नगरसेवकांनी आम्हाला दोन्ही पक्षाकडून संपर्क साधला जात आहे आणि प्रस्ताव समोर ठेवले जात आहेत, याबद्दल नेमकं काय करावं? याबद्दल विचारणा केली आणि उद्धव ठाकरेंचा मार्गदर्शन मागितलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षात बसणार आहोत. मात्र यामध्ये सुद्धा तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू, असं आपल्या नगरसेवकांना म्हटलं. (MNS-Shivsena UBT)
मनसेच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला?- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena)
कुठलाही प्रस्ताव जरी आला तरी पक्ष पातळीवर पक्ष यासंदर्भात निर्णय घेईल, त्यामुळे सध्या तरी विरोधी बाकावर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बसणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांसमोर स्पष्ट केलं. मनसेच्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? हा निर्णय घ्यायला नको होता. जर मनसे आणि आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एक ताकदीचा विरोधी गट कल्याण डोंबिवली महापालिकेत बसला असता, असे उद्धव ठाकरे नगरसेवकांशी संवाद साधताना म्हटले.
कल्याण-डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक निकाल- (KDMC Result 2026)
शिवसेना : 53भाजप : 50उबाठा : 11 मनसे : 5काँग्रेस : 2 राष्ट्रवादी : शरद पवार गट : 1--------------एकूण- 122
