Uddhav Thackeray and Nitin Gadkari: कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर उभारलेल्या प्रचंड मोठ्या आंदोलनामुळे अखेर देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. काही मंत्र्यांनी कॉकरोज जनता पार्टीच्या (CJP Protest) या मागणीची खिल्लीही उडवली होती. मात्र, जंतर मंतरवरील या आंदोलनाचे लोण देशभरात पसरताच धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्याविरोधात आणि पर्यायाने केंद्र सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना नाईलाजाने का होईना राजीनामा द्यावा लागला होता. जंतर मंतरवर 36 दिवसांपासून आंदोलन सुरु असले तरी हे आंदोलन खऱ्या अर्थाने गेल्या आठवडाभरात तापत गेले. सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात नेल्यानंतर या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत गेला. अशातच दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) 20 जुलैला विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केल्यानंतर हे आंदोलन अक्षरश: तापले. अवघ्या एका आठवड्यातील घडामोडींमुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता मोदी सरकारमधील आतापर्यंत निर्धास्त असलेल्या अन्य मंत्र्यांनाही आता धाकधूक वाटू लागली आहे. यामध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे.  उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील तिरंगा मोर्चाच्या व्यासपीठावरुन केलेल्या भाषणातून हेच संकेत दिले.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांचा उल्लेख जाणीवपूर्वक खड्डामंत्री असा केला. त्यानंतर माफ करा, मी चुकलो असे सांगून केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी, असे उद्धव यांनी म्हटले. नितीन गडकरी हे इथेनॉलवर बोलत आहेत. आहे, हा पुढचा विषय नक्की आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही खिल्ली उडवली. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे आता आगामी काळात मोदी सरकारमधील हे तीन मंत्री विरोधकांचं टार्गेट असतील, असे संकेत दिले आहेत. 

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन तापण्यापूर्वी देशभरात वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पेट्रोलमधील इथेनॉलच्या भेसळीचा मुद्दा प्रचंड गाजला होता. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवल्याने वाहने बिघडत असल्याच्या तक्रारी देशभरातून समोर येत होत्या. मात्र, नितीन गडकरी यांनी इथेनॉलविरहीत शुद्ध पेट्रोल विकत घ्यायचे असल्यास जास्त पैसे मोजावे लागतील,  अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यावरुन नितीन गडकरी यांना अनेकांनी टीकेचे लक्ष्य केले होते. सोशल मीडियावर  त्यांची अनेक मिम्स व्हायरल झाली होती. याशिवाय, आगामी काळात डिझेलमध्ये आइसोब्यूटेनॉल मिसळण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचीही चर्चा आहे. नितीन गडकरी यांचा मुलगा इथेनॉलनिर्मितीच्या क्षेत्रात असल्याने केंद्र सरकारकडून इंधनात इथेनॉल मिसळण्याला प्रोत्साहन दिले जात आहे, अशी चर्चाही रंगली होती. या सगळ्यामुळे नितीन गडकरी हे पु्न्हा एकदा रडारवर येण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा

Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...