Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (14 जून) 'मातोश्री'वर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या (Opration Tiger) पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील सर्व खासदारांना मुंबईत बोलावले आहे. उद्धव ठाकरे खासदारांना कोणता कानमंत्र देणार आणि कोणती नवी जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव गेल्या बैठकांना गैरहजर असल्याने ते आज हजर राहणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीतल्या सर्व खासदारांना मुंबई गाठण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे राज्यात लोकसभेचे 9 खासदार आहेत. यापैकी शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार पाहायला मिळते. तसेच ठाकरेंचे काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चांही रंगली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत किती खासदार उपस्थित राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ठाकरेसेनेच्या खासदारांच्या बैठकीवर मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी टीका केली आहे. ठाकरेंच्या डोक्यावरून आता पाणी गेलं असून त्यांच्या खासदारांचा आमच्याकडे येण्याचा विचार पक्का असल्याच गोगवलेंनी म्हटलं आहे. तर ऑपरेशन टायगर पूर्णत्वाच्या दिशेनं निघालं असल्याचं केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधवांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचं ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही-गुलाबराव पाटील (Gulabrao Patil On Eknath Shinde)

ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांच्या बैठकीवर मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ज्यांना ज्या पक्षात जायचं ते जातातच', असा टोला त्यांनी लगावला. आम आदमी पार्टी, टीएमसीचे खासदारही गेले, असे ते म्हणाले. मात्र शिवसेनेचं 'ऑपरेशन टायगर' वगैरे काही नाही, असा दावाही गुलाबराव पाटलांनी केला आहे. एकीकडे शिवसेनेच्या इतर नेत्यांनी ऑपरेशन टायगरला हवा दिली असताना गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानं चांगलीच चर्चा रंगली आहे.

शिवसेना(उबाठा)चे लोकसभेचे खासदार- (Shivsena UBT MP List)

  1. संजय देशमुख, यवतमाळ
  2. नागेश पाटील-आष्टीकर, हिंगोली
  3. संजय जाधव, परभणी 
  4. राजाभाऊ वाजे, नाशिक
  5. अरविंद सावंत, दक्षिण मुंबई
  6. अनिल देसाई, मुंबई दक्षिण-मध्य
  7. संजय दीना-पाटील, मुंबई उत्तर पूर्व
  8. भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी
  9. ओमराजे निंबाळकर, धाराशिव

महाराष्ट्रातील 48 खासदारांची यादी- (Maharashtra All Party MP List 2024)

अनुक्रममतदारसंघविजयी उमेदवारपक्ष
1अहमदनगर Ahmednagarनिलेश लंकेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
2अकोला Akolaअनुप धोत्रेभाजप
3अमरावती Amravatiबळवंत वानखेडेकाँग्रेस
4औरंगाबाद Aurangabadसंदीपान भुमरेशिवसेना
5बारामती Baramatiसुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
6बीड Beedबजरंग सोनवणेभाजप
7भंडारा गोंदिया Bhandara Gondiyaडॉ. प्रशांत पडोळेकाँग्रेस
8भिवंडी Bhiwandiबाळ्या मामा म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
9बुलढाणा Buldhanaप्रतापराव जाधवशिवसेेना
10चंद्रपूर Chandrapurप्रतिभा धानोरकरकाँग्रेस
11धुळे Dhuleसुभाष भामरेभाजप
12दिंडोरी Dindoriभास्कर भगरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
13गडचिरोली Gadchiroli - Chimurडॉ. नामदेव दासाराम किरसानकाँग्रेस
14हातकलंगणे Hatkanangaleधैर्यशील मानेशिवसेना 
15हिंगोली Hingoliनागेश पाटील आष्टीकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
16जळगाव Jalgaonस्मिता वाघभाजप
17जालना Jalnaकल्याणराव काळेकाँग्रेस
18कल्याण Kalyanश्रीकांत शिंदेशिवसेेना
19कोल्हापूर Kolhapurछत्रपती शाहू महाराजकाँग्रेस
20लातूर Laturशिवाजीराव काळगे काँग्रेस
21माढा Madhaधर्यशील मोहिते पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
22मावळ Mavalश्रीरंग बारणेशिवसेेना
23Mumbai Northपियुष गोयलभाजप
24Mumbai North Centralवर्षा गायकवाडकाँग्रेस
25Mumbai North Eastसंजय दिना पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
26Mumbai North Westरवींद्र वायकर शिवसेना
27Mumbai Southअरविंद सावंतशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
28Mumbai South Centralअनिल देसाईशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
29नागपूर Nagpurनितन गडकरीभाजप
30नांदेड Nandedवसंतराव चव्हाणकाँग्रेस
31नंदुरबार Nandurbarगोवाल पाडवीकाँँग्रेस
32नाशिक Nashikराजाभाऊ वाजेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
33उस्मानाबाद Osmanabadओमप्रकाश निंबाळकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
34पालघर Palgharहेमंत सावराभाजप
35परभणी Parbhaniसंजय जाधवशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
36पुणे Puneमुरलीधर मोहोळभाजप
37रायगड Raigadसुनिल तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
38रामटेक Ramtekश्यामकुमार बर्वेकाँग्रेस
39रत्नागिरीसिंधुदुर्ग Ratnagiri- Sindhudurgनारायण राणेभाजप
40रावेर Raverरक्षा खडसेभाजप
41सांगली Sangliविशाल पाटीलअपक्ष
42सातारा Sataraउदयनराजे भोसलेभाजप
43शिर्डी Shirdiभाऊसाहेब वाकचौरेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
44शिरुर Shirurअमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
45सोलापूर Solapurप्रणिती शिंदेकाँग्रेस
46ठाणे Thaneनरेश म्हस्केशिवसेेना
47वर्धा Wardhaअमर काळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
48यवतमाळ-वाशिम Yavatmal- Washimसंजय देशमुखशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

संजय राऊत काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Politics: 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडणार?; महत्वाची 5 कारणं आली समोर