Dharashiv News : धाराशिवमधील शिवसेना ठाकरे गटाच्या (Dharashiv Shivsena UBT) सर्व लोकप्रतिनिधीची आज मातोश्रीवर (Matoshree) महत्वची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी आमदार कैलास पाटील बैठकीसाठी मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांना संपर्क सुरू असून, ठाकरेंची शिवसेना (Uddhav Thackeray) आता सावध पावित्र्यात असल्याचे दिसून आले आहे.
 
Pratap Sarnaik on Kailas Patil : कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील

दरम्यान, एकीकडे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतीलअसाखळबळजनक दावा केला होता. मंत्री सरनाईकांचा या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चांना उधाण आले आहे. एकंदरीतसध्याचीराजकीयपरिस्थितीपाहता ठाकरेंची शिवसेना आता सावध पावित्र्यात आलीअसूनमातोश्रीवरआतायासंदर्भातखलबतहोणारआहे.

Continues below advertisement

धाराशिवमधील शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व लोकप्रतिनिधीची आज मातोश्रीवर महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आलेले सदस्य, तसेच नगरपरिषदेतील नगरसेवकांसोबतही संपर्क सुरू केला आहे. कळंब नगर परिषदेचे नगरसेवकांनी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना सावध पावित्र्यात असून मातोश्रीवर जिल्हाभरातील सर्व लोकप्रतिनिधींची आज बैठक बोलावली आहे.

Dharashiv News : धाराशिवमधील ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कोण हे चित्र आज स्पष्ट होणार?

Continues below advertisement

एकनाथ शिंदेयांनी २०२२ मध्ये केलेल्या उठावानंतर शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले होते. असे असताना कैलास पाटील सुरतवरून माघारी फिरले होते. त्यावेळी त्यांच्या निष्ठेची खूप चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा सरनाईकांच्या या वक्तव्याने आणि कैलास पाटील यांचे मित्र ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर, कैलास पाटील नेमकीकायभूमिकाघेतात, याकडे राजकीय वर्तुळातअनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, आमदार कैलास पाटील या बैठकीसाठी मुंबईत असून या बैठकीला कोण उपस्थित राहणार, यानंतर ओमराजांसोबत किती नगरसेवक असतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कोण कायम राहणार हे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळेआजच्यायाबैठकीलाविशेषमहत्वप्राप्तझालेआहे.

इतर महत्वाच्या बातम्या