Solapur Municipal Corporation Election 2026: सोलापूर मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जागावाटप आणि आघाडीसंदर्भातकुठलीही ठोसचर्चानझाल्याचेचित्रआहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटआणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये अजूनही आघाडीबाबत अद्यापनिर्णयझालानसून आघाडीबाबतही संभ्रम आहे. परिणामीठाकरेंच्या शिवसेनेनं (Shiv Sena UBT) एकटं लढण्याची तयारी सुरू केली आहे.
अशातचआता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पहिली यादी जाहीर केल्यानंतरआताठाकरेंच्याशिवसेनेकडून (Uddhav Thackeray Shiv Sena) देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना उबाठा गटानेआपलय 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीआहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा गटालाएकूण 30 जागा मिळाल्याचीचर्चाहोती. त्यामुळेपहिल्या 11 उमेदवारांचीघोषणाठाकरेंच्याशिवसेनेकडूनकरण्यातआलीआहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटापाठोपाठ शिवसेना उबाठानेही उमेदवारांची यादी जाहीर केलीय. शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनीही उमेदवार यादी जाहीर केलीय.
Solapur Municipal Corporation Election 2026: ठाकरेंच्या शिवसेनेकडून 11 शिलेदारांच्यानावाचीघोषणा
शिवसेनेउद्धवठाकरेगटाकडूनजाहीरकरण्यातआलेल्यायाउमेदवारांच्यायादीत प्रभाग क्रमांक 1 अ मधून रमेश व्हटकर, प्रभाग क्रमांक 2 ड मधून दिनेश चव्हाण, प्रभाग क्रमांक 4 क मधून प्रिया बसवंती, प्रभाग क्रमांक 6ड मधून गणेश वानकर, प्रभाग क्रमांक 9 डमधून सुरेश गायकवाड, प्रभाग क्रमांक 11 अ मधून शुभम स्वामी, प्रभाग क्रमांक 12 अ मधून प्रसाद माने, 13ड मधून वल्लभ चौगुले, प्रभाग क्रमांक 21 ड मधून भीमाशंकर म्हेत्रे, 23 क मधून लक्ष्मण जाधव आणि प्रभाग क्रमांक 23 ड अलका राठोड यांनाउमेदवारीजाहीरकरण्यातआलीआहे.
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादीकडून कोणते सहा उमेदवार जाहीर?
सोलापूर मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सोलापुरात राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्या आहेत. पहिल्या यादीत 6 उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष, माजी नगरसेविका सुनीता रोटे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. इतर पाच नवे चेहरे दिले आहेत.
राष्ट्रवादीचे पहिल्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ड मधून राकेश मनोहर सोनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 8 अ मधून मोहम्मद नकीब हासीब कुरेशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 17 क मधून बिस्मिल्ला शिकलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 अ मधून सुनिता दादाराव रोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 26 अ मधून नागिणी प्रवीण इरकशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर प्रभाग क्रमांक 18 क मधून अंबादास सोमण्णा नडगीरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
