Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेला आता जवळ जवळ निर्णायक वळण मिळत असल्याचे चित्र आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तरदुसरीकडेयाबंडखोरीचेतीव्र पडसाद परभणी, बीड, हिंगोलीसहराज्यभरातउमटतानादिसतआहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. सोनपेठमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक होत खासदार संजय जाधव यांच्याविरोधात तीव्र जोडेमार आंदोलन केले आहे. सोनपेठ येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिक प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट खासदार संजय जाधव यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला आणि तिथूनच त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. 'गद्दार संजय जाधव' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा मोर्चा शहराच्या मुख्य भागात आणला.
'आम्ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंसोबतच' शिवसैनिकांचीभूमिका
शहरातील प्रमुख मार्गानं ही अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला होता. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीमुळे परभणी जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, "आम्ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंसोबतच आहोत", हाच संदेश सोनपेठच्या या कडक आंदोलनातून शिवसैनिकांनी दिला आहे. या बंडखोरीचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Beed News : सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सेनेचा संताप, बीडमध्ये प्रतीकात्मक पुतळे जाळून तीव्र निषेध
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाच्या कथित ‘मिशन टायगर’ची चर्चा सुरू असतानाच बीडमध्ये ठाकरे समर्थक शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बंडखोर खासदारांविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित खासदारांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी इशारा देत, “या सहा खासदारांना बीड जिल्ह्यात येऊ देणार नाही,” अशी भूमिका मांडली. त्यामुळे या बंडखोरीचे पडसाद रस्त्यावरही उमटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Hingoli News : आम्ही आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे, हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार वेगळा गट स्थापन करून उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे या सहा खासदारांमध्ये एक हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर सुद्धा सहभागी आहेत हिंगोली मध्ये शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिक जमायला सुरुवात झाली असून नागेश पाटील आष्टीकर हे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडून आले आहेत आणि आता परत ते महायुतीत जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा त्याचबरोबर आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नसून आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे प्रतिक्रिया हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी दिली आहे.
