Uddhav Thackeray Operation Tiger: 5 कोटींचं आमिष, 'ऑपरेशन टायगर'च्या वावड्या उठताच उद्धव ठाकरेंची मोठी ॲक्शन, खास शिलेदाराला तडकाफडकी नाशिकला पाठवलं; नेमकं काय घडतंय?
Uddhav Thackeray Operation Tiger: नाशिक महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

Uddhav Thackeray Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) चे जोरदार हादरे आता नाशिकमध्ये बसू लागले आहेत. नाशिक महानगरपालिकेतील (Nashik Municipal Corporation) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena UBT) 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या वावड्या उठल्या आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख (Communication Chief) रवींद्र मिर्लेकर हे तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले असून, आज त्यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांची अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक बोलावली आहे. या हाय-व्होल्टेज घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला आहे.
Uddhav Thackeray Operation Tiger: 5 कोटींचे आमिष आणि 'त्या' वकिलाचा गेम प्लॅन?
या सर्व प्रकरणाला तेव्हा गंभीर वळण मिळाले, जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी पत्रकार परिषदेत एक खळबळजनक आरोप केला. पोरजे यांच्या दाव्यानुसार, "उपमहापौरपदाचा सौदा करू पाहणारे काही एजंट आमच्या नगरसेवकांना 5 कोटी रुपयांच्या प्रभाग निधीचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करत आहेत." यामध्ये एका वकिलाचा समावेश असून, ज्याला स्वतःला स्वीकृत नगरसेवक व्हायचे आहे, तोच 5 ते 6 नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.
Uddhav Thackeray Operation Tiger: 'ऑपरेशन तुडवा'चा थेट इशारा
या पक्षांतराच्या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी ठाकरेंच्या नगरसेवकांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आणि आपली वज्रमूठ दाखवली. "आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही, आम्ही सर्वजण निष्ठावंत आहोत," असा दावा करत, "ज्याप्रमाणे खासदार फुटले तेव्हा 'ऑपरेशन तुडवा' राबवण्यात आले, तसेच आता 'ऑपरेशन तुडवा' राबविणार," असा थेट इशारा गटनेत्यांनी विरोधकांना दिला आहे.
Uddhav Thackeray Operation Tiger: 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर, 2 जण अनुपस्थित
नाशिक मनपामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकूण 15 नगरसेवक आहेत. या शक्तिप्रदर्शनादरम्यान 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर होते. तर नगरसेविका मंगला आढाव आणि मुरलीधर भामरे हे दोघे कौटुंबिक दुःखद कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, भामरे यांच्या मुलाने हजेरी लावून पक्षप्रमुखांसोबत असलेली निष्ठा जाहीर केली.
Uddhav Thackeray Operation Tiger: आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
मातोश्रीकडून या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली असून, आज रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत बैठकी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रवींद्र मिर्लेकर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर सविस्तर आढावा घेणार आहेत. या बैठकीत रवींद्र मिर्लेकर नगरसेवकांना काय संदेश देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली






















