Uddhav Thackeray on ZP Election Result 2026: पैशाच्या महापुराला निष्ठेची भिंत तोडता आली नाही, जिल्हा परिषद निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महायुतीवर निशाणा
Uddhav Thackeray on ZP Election Result 2026: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषद आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी पराभव मान्य करतानाच पक्ष कार्यकर्त्यांचे आणि विजयी उमेदवारांचे मनोबल वाढवणारे वक्तव्य केले आहे.

Uddhav Thackeray on ZP Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा (ZP Election Result 2026) आणि 125 पंचायत समित्यांसाठी (Panchayat Samiti Election 2026) नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांवर झेंडा फडकावला. यामध्ये 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, 3 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना (शिंदे गट) तर पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका पाठोपाठ आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही विजयाची हॅटट्रिक साधत भाजप राज्यातील नंबर वन पक्ष ठरला आहे. याउलट महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निकालांवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी पराभव मान्य करतानाच पक्ष कार्यकर्त्यांचे आणि विजयी उमेदवारांचे मनोबल वाढवणारे वक्तव्य केले आहे.
उरण आणि रायगड येथील शिवसेनेच्या (उबाठा) विजयी उमेदवारांनी रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उमेदवारांचे अभिनंदन करत मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही खरंच कमाल केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही यश मिळवलं आहे.”
Uddhav Thackeray on ZP Election Result 2026: पैशाच्या महापुराला निष्ठेची भिंत तोडता आली नाही
उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत म्हटले की, “निवडणुकीत पैशाचा महापूर असूनही निष्ठेची भिंत तोडता आली नाही. लोक आजही आपल्याकडे आशेने पाहत आहेत.” तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना निराश न होता पुढील लढ्यासाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला.
Uddhav Thackeray on ZP Election Result 2026: उद्याचा काळ हा आपलाच असेल
“आज परिस्थिती प्रतिकूल असली तरी उद्याचा काळ हा आपलाच असेल. या निवडणुका तुम्ही धैर्याने लढल्या, हीच खरी ताकद आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, ग्रामीण महाराष्ट्राचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असले तरी, उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेमुळे शिवसेना (उबाठा) आगामी काळात पुन्हा ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या

























