एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Vishakha Raut : आम्ही लढाई लढूच, एकतर्फी कारवाई आणि बेबंदशाही सुरु, उद्धव ठाकरे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जाताच म्हणाले...   

Uddhav Thackeray : विशाखा राऊत यांचं मुंबई महापालिकेचं नगरसेवकपद रद्द झाल्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी बेबंदशाही सुरु असल्याचं म्हटलं. 

Uddhav Thackeray on Vishakha Raut मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुंबई महापालिकेतील पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही ती लढाई लढूच, न्यायालयात 8-10 ते 15 वर्षं लागतील असं म्हटलं. सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांविरोधातील प्रकरणांचे निकाल लागत नाहीत,एकतर्फी कारवाई केली जातेय,बेबंदशाही सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

 उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विशाखा राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी ती लढाई आम्ही लढूच असं म्हटलं. याचवेळी त्यांनी प्रक्रियेसंदर्भात काही प्रश्न विचारले. ती लढाई तर आम्ही लढूच न्यायालयामध्ये, पुन्हा त्याच्यामध्ये आठ-दहा वर्ष, 15 वर्ष जातीलच परंतु एका बाजूने आमचे नगरसेवक दणादण बाद करताना त्यांच्यावरती ज्या केसेस आहेत त्याचा निकाल का नाही लागत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही जातीची प्रमाणपत्र नाक्यावरच्या दुकानातून घेतलीत आणि त्यांनी फार मोठ्या ठिकाणाहून आहे असं नाहीये. जिथून आम्ही प्रमाणपत्र घेतले तिथूनच त्यांनी घेतलेत. आमच्या बाबतीत जर का दणादण तुम्ही निर्णय घेत असाल तर यालाच बेबंदशाही सुरु आहे, असं म्हणत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. एकतर्फी कारवाई चाललेली आहे. आमचे नगरसेवक जर तुम्ही बाद ठरवत असाल तर तुमचेही नगरसेवक ज्यांच्यावर आक्षेप आहेत बाद ठरले गेले पाहिजेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

विशाखा राऊत यांचं प्रमाणपत्र रद्द

विशाखा राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणूक वॉर्ड क्रमांक 191 मधून लढवली होती. विशाखा राऊत यांनी काढलेलं ओबीसी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द ठरवल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भात आज उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले होते. 

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा 

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाला आणि ते मांडत असलेल्या मुद्यांना पाठिंबा असल्याचं म्हटलंय.  नीट परीक्षेचा गोंधळ झालेला तेव्हा जंतरमंतरवर आंदोलन करणारे अभिजीत दिपके आणि ज्यांना कॉकरोच म्हणून हिणवलं गेलं त्यांना उघडपणे पाठिंबा देणारा शिवसेना पहिला राजकीय पक्ष असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. एमपीएससीच्या गोंधळामध्ये सुद्धा आता राजीनामा नेमका कोणाचा घ्यायचा कारण तिकडे मंत्र्याचा घेतला गेला तर इकडे कोणाचा घ्यायचा असा सवाल असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला थावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला थावणीचं स्वरुप
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Dattatray Bharane : आपलं पॅनेल 10 हजार मतांच्या लीडनं विजयी झालं पाहिजे, दादांच्या फोटोकडे पाहा, गमती जमती करु नका : दत्तात्रय भरणे
दादांचे आपल्यावर किती उपकार हे समोरच्या माणसाला कळायला पाहिजे होतं, दत्तात्रय भरणेंचा पुरुषोत्तम जगतापांना टोला
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
Advertisement

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget