Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: तरुणांचे आणि कॉकरोच जनता पार्टीचे (Cockroach Janta Party) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वाढती जवळीक पाहता शिंदे शिवसेनेकडून सुद्धा अभिजीत दीपकेंसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अभिजीत दीपकेंला मिळालेल्या यशानंतर त्याला आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची (Shivsena) रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
सत्ताधारी भाजप विरोधात विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून सर्वातआधी जाहीर पाठिंबा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरेंनी रोज अभिजीत दीपकेंसोबत आंदोलन सुरू असताना संवाद ठेवला आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्ष दिल्लीतल्या आंदोलनासोबत असल्याचं सांगितलं. इतकंच काय तर अभिजीत दीपकेंच्या आणि त्याच्या तरुणांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी देशभर केलं. दिल्लीतील जंतर-मंतर इथे उद्धव ठाकरे खास अभिजीत दीपकेंच्या भेटीला तर गेले, शिवाय तरुणांच्या आंदोलनात त्यांनी दिल्लीत जाऊन पाठिंबा दिला. त्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आणि राज्यभरसुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलनं केली. उद्धव ठाकरेंशी अभिजीत दीपके या तरुण नेतृत्वाची वाढती जवळीक बघता शिंदे शिवसेनेकडून सुद्धा आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दीपकेंसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. (Shivsena With Abhijeet Dipke)
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच- (Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke)
छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या मतदार संघातील अभिजीत दीपके आणि त्याच्या कुटुंबीयांची त्यांनी घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर शिंदे शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी सुद्धा अभिजीत दीपके यांची घरी जाऊन भेट घेत संवाद साधला. शिंदे शिवसेना भाजप सोबतसत्तेत असताना अभिजीत दीपकेंसोबत शिंदे शिवसेनेने संवाद सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा अभिजीत दिपकेंच्या घरी जाऊन त्यांची आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली सोबतच उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून बोलणं करून दिला. आपल्या विरोधी ठाकरे शिवसेनेची वाढती जवळील पाहता दीपकेंसोबत शिंदे शिवसेनेने सुद्धा संवाद सुरू ठेवला आहे. भविष्यात अभिजीत दीपके राजकारणात सक्रिय होणार की नाही? याबाबत स्पष्टता नसली तरी दोन्ही शिवसेनेकडून जवळीक साधण्याचा प्रयत्न आधीपासूनच केला जातोय. भविष्यात हे तरुण नेतृत्व आपल्या सोबत राहावं यासाठी दोन्ही शिवसेना रस्सीखेच करत असल्याचा सध्याचे चित्र दिसतंय.
