एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : अजित पवार बेधडकपणे सांगतायत, शेतकऱ्यांनो हातपाय हलवा, मग सरकार म्हणून तुम्ही काय हलवताय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : तुम्ही शेतकऱ्यांना हातपाय हलवायला लावताय, मग सरकार म्हणून तुम्ही काय हलवताय? असा मिश्किल सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोफ डागली आहे.

Uddhav Thackeray : पंचांग पाहून मुहूर्तवर मुहूर्त निघून गेलेत, मात्र अद्याप सरकारला मुहूर्त सापडत नाहीये. अजित पवार (Ajit Pawar) तर बेधडकपणे सांगताय कि 'आम्हाला निवडणूक जिंकायची होती म्हणून आम्ही कर्जमाफीची (Farmers loan waiver) घोषणा केली. मात्र आम्हालाही अडचणी आहेत. पण तुम्ही जरा हातपाय हलवा', असं उपमुख्यमंत्री सांगताय, कोणाला सांगताय तुम्ही? देशाच्या अन्नदात्याला? आता आपत्ती अशी आलीय कि हातपाय हलवणाऱ्या शेतकऱ्याला तोच हात कपाळावर मारून घ्यायची वेळ आली आहे. त्यात तुम्ही शेतकऱ्यांना हातपाय हलवायला लावताय, मग सरकार म्हणून तुम्ही का हलवताय? असा मिश्किल सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठारेंनी (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोफ डागली आहे. तसेच मराठवाड्यातील अतिवृष्टीने (Marathwada Heavy Rain) बाधित शेऱ्यांच्या मुद्दयांवरून सरकारवर सडकून टीका केलीय.

Uddhav Thackeray on Loan Waiver : शेऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती करा आणि हेक्टरी 50 हजार रुपये द्या

मराठवाड्यातील (Marathwada) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) पाहणी दौरा सुरू केला आहे. 'आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिहारमधे सांगताहेत की सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे', असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, पीक विम्यापोटी 2, 3 रुपये देऊन थट्टा केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सरकारने जूनपर्यंत कर्जमाफीचा दिलेला वायदा आम्हाला मान्य नाही, शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती (Loan Waiver) करा आणि हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. ही मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन (Protest) करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

Uddhav Thackeray : ...तर तुमच्या ऐकीने या सरकारला पाझर फुटणार नाही का?

मी आज मत मागायला आलेलो नाही, तर तुमच्या लढ्यासाठी मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर आलोय. तुमच्यामुळे माती बी पेरून अंकुर फुटतं, तर तुमच्या ऐकीने या सरकारला पाझर फुटणार नाही का? तुम्ही आता शेतकरी म्हणून एक व्हा, असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं.  उद्धव ठाकरे आजपासून सलग चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का?, सरकारने दिलेल्या पॅकेजचे काय झालं?, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली किती रक्कम पोहोचली?, शेतकऱ्यांच्या हातात महिनाभरानंतर किती पैसे आले? याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. अशातच या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray on Maharashtra Government: शेतकऱ्याची थट्टा सरकारने लावली आहे

दरम्यान, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हि शेतकऱ्याची थट्ट आहे, पीक विम्याचे किती लोकांना पैसे मिळाले. मुळात पीकविम्याची किती रक्कम मिळणं अपेक्षित होती आणि मिळाली किती हा मोठा प्रश्न आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यात दोन- तीन रुपये रक्कम मिळाली, हि शेतकऱ्याची थट्टा सरकारने लावली आहे. आता मुख्यमंत्री सांगताय, आता कर्जमाफी केली तर बँकेचा फायदा होईल. हे अजब लॉजिक मला काही कळलं नाही. शेतकरी कर्जमाफी आधी खरडून गेलेली माती मागतोय. मात्र मी तुमच्या सर्व शेतकऱ्यांसोबत कायम आहे. असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Leopard Attack: ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला,  दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
Pune Godwoman Fraud: भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav on Farm Crisis: 'मुख्यमंत्री Bihar मध्ये, PM चं प्रेम Maharashtra पेक्षा Bihar वर जास्त'; ठाकरेंचा हल्लाबोल
Pune Crime: 'अंगात शंकर महाराज येतात', सांगून IT Engineer ला 14 कोटींना गंडवणारी मांत्रिक फरार
MCA Election : 155 पंचांच्या समावेशावरून वाद, Mumbai Cricket Association निवडणुकीला High Court मध्ये आव्हान
Sangli Statue : 'आम्ही पुतळा परत नेणार नाही', शिवप्रेमी आक्रमक; पोलीस आणि समितीत वाद
Aamir Khan Deepfake: आमिर खान बनावट व्हिडिओ प्रकरण, पुरावे न मिळाल्याने केस बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Leopard Attack: ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला,  दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
Pune Godwoman Fraud: भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
Pune Leopard Attack: पुण्यातील पिंपरखेडमध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला, समोर माणसं दिसताच डरकाळी फोडली
पुण्यातील पिंपरखेडमध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला, समोर माणसं दिसताच डरकाळी फोडली
Pune Crime Bhondu Baba: ...म्हणून तुमच्या मुली बऱ्या होत नाहीयेत, IT इंजिनिअर अन् शिक्षक पत्नीला भोंदूबाबनं कसं लुटलं, त्याच पैशांनी कोथरूडमध्ये विकत घेतला अलिशान बंगला
...म्हणून तुमच्या मुली बऱ्या होत नाहीयेत, IT इंजिनिअर अन् शिक्षक पत्नीला भोंदूबाबनं कसं लुटलं, त्याच पैशांनी कोथरूडमध्ये विकत घेतला अलिशान बंगला
Eknath Shinde CM: एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी?
एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी?
ट्रम्पकडून तगड्या विरोधानंतरही न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत गुजराती मुस्लिम जोहरान ममदानींनी विजय खेचून आणला; गेल्या 100 वर्षातील पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर
ट्रम्पकडून तगड्या विरोधानंतरही न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत गुजराती मुस्लिम जोहरान ममदानींनी विजय खेचून आणला; गेल्या 100 वर्षातील पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर
Embed widget