Uday Samant on Eknath Shinde:महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे सत्तेमध्ये सहभागी असतानाही वारंवार भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य करताना दिसून येत आहेत. भंडाऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शेतकरी आत्महत्येवरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. "विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. "कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही," असा थेट इशाराही बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. तसेच बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी जाहीर इच्छा देखील व्यक्त केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील यावर मोठं वक्तव्य केलंय. 

Continues below advertisement

Uday Samant on Eknath Shinde: बच्चू कडूंप्रमाणे माझीही मागणी, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं 

आमदार बच्चू कडू यांच्या या विधानावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी असेल. शेतकऱ्यांच्या बाबत त्यांची मागणी होती. 50 हजार सानुग्रह अनुदान दिलं, त्यांनी 1 लाखांची मागणी केली. मी बच्चू कडू यांच्याशी बोललो आहे. मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी वैयक्तिक आहे. मात्र ही मागणी स्वाभाविक मागणी आहे. माझीही मागणी आहे की, शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. जशी भाजपची मागणी असते देवेंद्र फडणवीस व्हावे, तशीच आमची मागणी असते. बच्चू भाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंती करायची होत्या त्या केल्या आहेत," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. आता बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते यावर काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Uday Samanat on Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकमधील तिढ्यावर काय म्हणाले उदय सामंत? 

नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी आणि राजकीय पेचावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, आज पुन्हा एकदा गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. मी अजून सकारात्मक आहे, दबाव टाकत नाही विनंती करत आहे. गणेश गिते भाजपात काम करत आहेत, त्यामुळे मी विनंती करण्यासाठी येत आहे. दबाव टाकायचा असेल तर 4 वेळा मी बैठकीसाठी आलो नसतो. दबाव न टाकता कोणी असे म्हणू नये. नगरसेवकांवर विश्वास नाही, असे नाही. राज्यात 11 ठिकाणी निवडणुका होत आहेत, फक्त नाशिकची चर्चा जास्त होत आहे. संयमाने प्रश्न सुटावा असे आमचे मत आहे. सोलापूर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी उमेदवारी मागे घेतली आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटच्या दिवशी तीनपर्यंत आम्ही गोकुळ गिते यांची वाट पाहत होतो. प्रसाद हिरे यांच्याशी देखील गिरीश महाजन चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Continues below advertisement

आणखी वाचा 

Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य