Uday Samant Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोल करणार नाहीत, यासाठी आम्ही जे जे काय लागतील ते प्रयत्न करु, असे वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका कायम आहे. भविष्यामध्ये सुद्धा ही भूमिका कायम राहणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. ते शनिवारी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maratha Kunbi Certificate)

Continues below advertisement

यावेळी उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबतची राज्य सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांना दोघांनाही आमचं सांगणं आहे की, कोणाचंही आरक्षण कमी करून आम्ही आरक्षण देणार नाही. दोन्ही समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेले आव्हान देशातल्या भगिनींसाठी महत्त्वाचे आहे. या विषयाला विरोधक वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जात आहेत, त्यापेक्षा या विधेयकाला सहकार्य करावे आणि राजकीय महिला भगिनींना न्याय मिळवून द्यावा. या मुद्द्यावरुन राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा या विधेयकाच्यादृष्टीने सकारात्मक विचार केला पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले.

यावेळी उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यावरही निशाणा साधला. आदित्य ठाकरे घरातून बाहेर पडून एखाद्या उद्योगाला ते भेट देताहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. हे फारच चांगले आहे. त्यांना चाकणच्या उद्योजकांना जाऊन भेटावसं वाटलं, हेच भाग्य आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनाही उदय सामंत यांनी लक्ष्य केले. ते माझ्या विमानात बसणार असतील तर मी पण त्यांना विमानात घेतो. एवढी जेलसी कशाला असली पाहिजे. एवढी जेलसी असू नये, अंबादास दानवे यांना मी मांडीवर बसवायला देखील तयार आहे. राजकारणात एवढी जेलसी आणि चिडचिड करुन चालत नाही. अंबादास दानवे यांना माझ्या फिरण्याचा त्रास होत नसेल तर त्यांनी माझ्यासोबत येऊन बसावे. तुम्ही काय करताय हे सांगावं, आपले अस्तित्व नष्ट झाले आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा त्यांचे 2029 मधले मतदारसंघ सांभाळावेत. या मतदारसंघातून त्यांनी निवडून येऊन दाखवा व मग माझ्यावर टीका करावी, असे उदय सामंत यांनी म्हटले.

Continues below advertisement

Operation Tiger: एकनाथ शिंदे उच्च पदावर बसावेत, ही आमची इच्छा, त्यामध्ये गैर काय? उदय सामंतांचा प्रतिप्रश्न

 हे काय सांगून होत नाही, शिंदे साहेब काय करु शकतात हे चार वर्षांपूर्वी बघितले आहे. आमचे पक्षप्रवेश रोज सुरु आहे, काँग्रेसचे 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच्यासोबत येतात, ही एकनाथ शिंदे साहेबांची किमया आहे. मी सुद्धा शिवसेनेमध्ये काम करतो. एकनाथ शिंदे उच्च पदावर बसावेत, ही आमची सर्वांची इच्छा असणार आहे. भाजपचे नेते फडणवीस आहेत, ते पण उच्चपदावर बसावेत, असे भाजपला वाटते. आमच्या नेत्याविषयी आम्हाला वाटलं तर गैर काय आहे, असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे यांच्यावर कोणीही येऊन टीका करणे म्हणजे काजव्याने सूर्याशी तुलना करणे यासारखा आहे. काजव्यांनी असं मानायचं की मी सूर्य आहे. गणेश नाईक कुठल्या शर्यतीमध्ये होते या हा माझ्यासाठी गौण भाग आहे. एनडीएमध्ये एकनाथ शिंदे यांचे तीन नंबरचे स्थान आहे. जे साहेबांवरती टीका करतात त्यांच्या अनेक नातेवाईकांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांनी कधीच पराभव बघितलेला नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले.

आणखी वाचा

Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे तापाने फणफणले, 102 इतका ताप, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट