Tukaram Mundhe In Vidhanbhavan Sting Energy Drink: राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी (Sting Energy Drink) घालण्यात आली आहे. शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये आता स्टिंग पेय विक्रीसाठी बंदी असणार आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग पेयबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचे निर्देश राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्याचे निर्देश दिले. (Ban on sale of Sting drink within school premises)
स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. नियमात बसत असले तरी मुलांना याची सवय लागते. लहान मुले, गरोदर महिलांसाठी पिण्यासाठी योग्य नसल्याचे स्टिंग पेयच्या बाटलीवरचं लिहिले आहे. लहान मुलांना याची विक्री होवू नये. दारूपेक्षाही स्टिंग एनर्जी ड्रिंक हे घातक आहे, अशी माहिती श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत दिली. यावर स्टिंग हे शाळेच्या आवारात हे विकले जातंय हे मान्य आहे. शाळांच्या 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह स्टिंग एनर्जी ड्रिंकवरही बंदी घालू, असं आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली. (Ban on sale of Sting drink within school premises in maharashtra)
तुकाराम मुंढेंची विधानभवनात एन्ट्री- (Tukaram Mundhe In Vidhanbhavan)
आज विधानसभेत स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत चर्चा होती. त्यामुळे तुकाराम मुंढे विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान, राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम (FDA Maharashtra) राबवत आहे. अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानूसार महाराष्ट्रभर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंटवर देखील कारवाई केली जात आहे.
तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत तपासणी सुरू- नरहरी झिरवळ (Tukaram Mundhe FDA)
अनेक पेय उर्जा देण्याच्या नावाखाली शाळा परिसरात ड्रिंक्स विक्री, शाळा परिसरात फ्लेवर पानाखाली अंमली पदार्थ विक्री होते, चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राहुल कुल यांनी केली. तसेच दुध भेसळ फ्लेवर मिल्क नावाखाली विक्री होते, जास्त साखर, कृत्रिम द्रव्य वापर होतो, याचीही चौकशी केली जावी, असं राहुल कुल म्हणाले. यावर तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत तपासणी सुरू आहे, अशी माहिती नरहरी झिरवळांनी विधानसभा सभागृहात दिली.
मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई- (Tukaram Mundhe FDA Action In Mumbai)
राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम (FDA Maharashtra) राबवत आहे. आता अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटसह बेकरींवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या आदेशानुसार धडक कारवाई (FDA Action In Mumbai Hotel) करण्यात आली. मुंबईतील आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटसह सहा रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरी आणि क्लबच्या अन्न सुरक्षा परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नरिमन पॉइंट येथे ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची 27 जून रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापनेच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर बोरीवली इथल्या एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. याशिवाय, भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्र्यातही कारवाई करण्यात आली.
तुकाराम मुंढेंनी 25 मे रोजी स्वीकारला होता पदभार- (Tukaram Mundhe News)
गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. त्यानुसार 25 मे रोजी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.
