Tukaram Mundhe At Majha Katta: सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दररोज भेसळयुक्त, अस्वच्छता असणाऱ्या हॉटेलवर कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, एफडीएचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. (Tukaram Mundhe Marathi News)

Continues below advertisement

तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले? (Tukaram Mundhe at Majha Katta)

तुमच्या इतक्या बदली झाल्या. यादरम्यान, FDA चे अधिकारी याच्या आधी जर एवढे कार्यक्षम असते, तर तुम्हाला एवढ्या सगळ्या कारवाया करायची वेळच आली नसती. तुम्हाला काम करताना सर्वात जास्त कामचुकार आणि निर्ढावलेले अधिकारी कोणत्या विभागामध्ये भेटले?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रत्येक ठिकाणी, कुठेही गेलात तर तुम्हाला काही टक्यांमध्ये निर्ढावलेले अधिकारी दिसतील, काही एक्सलंट दिसतील, काही ॲव्हरेज दिसतील, काही गुड दिसतील... तर परसेंटेज व्हेरी (vary) होऊ शकतं. त्याच्यामुळे एक असं विभाग सांगता येणार नाही. प्रत्येक विभागाचा वेगळा अनुभव आहे. प्रत्येक सिस्टिममध्ये तुम्हाला काही परसेंटेज वर्स्ट (worst) पासून ते बेस्ट (best) पर्यंत सगळ्या ठिकाणी दिसतील. प्रत्येक ठिकाणी चांगल्या-वाईट सगळ्याचेच अनुभव आहेत. आणि म्हणून जे वाईट आहे ते कमीत कमी करणे, चांगले वाढवून नेणे आणि जे सुधारणारच नाहीत त्यांच्यावरती कारवाई करणे... ही जी पद्धत घालून दिलेली आहे, त्याप्रमाणे आपण पुढे जायचं, असं तुकाराम मुंढेंनी सांगितले.

Continues below advertisement

शुद्ध पनीर कसं ओळखायचं?, तुकाराम मुंढेंनी सांगितलं- (Tukaram Mundhe On Paneer)

सर्वसामान्यांच्या आवडीचे पनीर हे शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे कसं ओळखायचं याबद्दल तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली. एक किलो पनीर बनवायचं असेल तर किमान पाच लिटर दूध लागतं. गायीचं दूध 60 रुपये लिटर जरी पकडलं तरी त्यासाठी 300 रुपयांचं दूध गरजेचं आहे. तसेच इतर गोष्टी जसं की पॅकेजिंग, कामगारांचा पगार असं जर एकत्रित धरलं तर एक किलो पनीर तयार करण्यासाठी 400 ते 500 रुपये लागतात. त्याच्या आत शुद्ध पनीर तयार होऊ शकत नाही, असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं. आपण बाजारात गेल्यानंतर 200 ते 300 रुपये किलो असे पनीर घेतो. त्यावेळी आपल्या मनामध्ये काहीच प्रश्न उपस्थित होत नाहीत. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण स्वस्त पनीर घेतो. पण ते पनीरच आहे की इतर काही आहे हे आपण तपासत नाही. त्यामुळे आम्ही यामध्ये तपासणी केली असता 35 टक्के सॅम्पल्समध्ये भेसळ असल्याचं आढळून आलं. त्यासाठी पामतेल किंवा इंडस्ट्रियल ऑईलचा प्रामुख्याने वापर केला जात असल्याचं दिसून आलं. आपण प्रोटिन म्हणून खाणाऱ्या पनीरमध्ये फॅट असतं आणि ते आपल्या आरोग्याला अतिशय धोकादायक असतं, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं. 

स्पष्टवक्तेपणामुळे आणि कठोर प्रशासनामुळे तुकाराम मुंढे अनेकदा चर्चेत- (Tukaram Mundhe Marathi News)

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी असून आपल्या कडक, पारदर्शक आणि शिस्तप्रिय कामकाजाच्या शैलीमुळे ते राज्यभर परिचित आहेत. नाशिक महापालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML), नागपूर महापालिका, सोलापूर महापालिका तसेच महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) यांसह विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. शासकीय कार्यालयांमधील शिस्त, भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिका, अनधिकृत बांधकामांवर कारवाई आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि कठोर प्रशासनामुळे ते अनेकदा चर्चेत राहिले असून, काही निर्णयांवरून वादही निर्माण झाले. तरीही प्रामाणिक, नियमांनुसार काम करणारे आणि जनहिताला प्राधान्य देणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

संबंधित बातमी:

Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला