नाशिक : राज्यातील सातत्याने नाव आणि फोटोवरुन वाद निर्माण होत असतात, त्यातच महापालिका (Malegaon) निवडणुकांच्या निकालानंतर मालेगाव महापालिकेत टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यासंदर्भाने केलेल्या वक्तव्यावरुन आणि फोटो लावण्यावरुन गदारोळ झाला होता. त्यानंतर, आता येथील मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान (Tipu sultan) यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. 

Continues below advertisement

उपमहापौर शान ए हिंद यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो झळकल्याचं दिसून आलं. आजच्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्या दालनात हा फोटो दिसून आला. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. 

आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट शब्दात म्हटले आहे.   

Continues below advertisement

फोटो काढायला लावणार - दादा भुसे

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, दादा भुसेंनी आज शाळा आणि कोचिंग क्लासेस संदर्भाने पत्रकार परिषदेती माहिती दिली. ज्या क्लास आणि शाळा-महाविद्यालयांचे टायअप आहे, जे विद्यार्थी कॉलेजला न जाता क्लासला जातात त्या शाळेच मान्यता रद्द केली जाईल, असे दादा भुसेंनी म्हटले. खासगी क्लासने जास्तीत जास्त फी किती आकारली पाहिजे, याबाबतीत देखील सभागृहात निर्णय घेतले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा

4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार