Eknath Shinde Plan For Mumbai Muncipal Corporation Election 2025 मुंबई: मुंबई महानगर पालिका निवडणुकींसाठी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई महानगर पालिका जिंकण्यासाठी शिंदे मुंबईत अगदी मायक्रो मॅनेजमेंटवर भर देत आहेत. विविध समाज, जात किंवा व्यवसायनिहाय असे सेल बनवून 'ठाणे पॅटर्न' मुंबईत शिंदे राबवणार आहेत. आता हा ठाणे पॅटर्न मुंबईत किती यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं असेल.
ठाणे महानगर पालिका हा शिवसेनेचा विशेषता एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र हा बालेकिल्ला एवढी वर्ष कसा राखून ठेवला याचं गणित एकनाथ शिंदेंनी पदाधिकारी मेळाव्यात उलघडून सांगितलं. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ठाण्यात विविध समाज, जात किंवा व्यवसायनिहाय सेल उभे केले आहेत. या सेलचं वैशिष्ठ असं की, एका विशिष्ठ समाजाचा सेल तयार करून त्यांच्यातील एका व्यक्तीला लोकप्रतिनिधी नेमून त्याच्या अंतर्गत सर्व समाज एकवटून त्या समाजाचे प्रश्न मार्गी लावून तो समाज आपल्या मागे कसा उभा राहिल अशी यंत्रणा उभी केली आहे. त्याच जोरावर ठाण्यात बहुभाषिकांची मोट बांधून शिंदेंनी आपला बालेकिल्ला मजबूत केला आहे.
'ठाणे पॅटर्न' मुंबईत राबवणार- (Thane Pattern In BMC Election)
शिवसेनेत उभी फूट पडलयानंतर शिंदेंच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यात लोकसभेत जरी महायुती कमी पडली असली. तरी विधानसभेत शिंदेंनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रा पालथा घातला. त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या जोरावर शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं, मात्र महापालिका निवडणुकीत शिंदेंसह भाजपच कसं लागला आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंनी कंबर कसून पदाधिकारी बैठका, मेळावे, नेत्यांच्या जबाबदार्याही वाटून दिल्या आहेत. शिवसेनेच्या फुटीचा फटका उबाठाला राज्यभरात बसला. मात्र मुंबई हा आपलाच गड असल्याचा दावा जरी उबाठाकडून केला जात आहे. उबाठाचा हाच गड सर करण्यासाठी शिंदेंनी आता 'ठाणे पॅटर्न' मुंबईत राबवणार आहे.
शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ पुन्हा अॅक्टीव केली जाणार- (Eknath Shinde Plan For BMC)
- मुंबई आणि महाराष्ट्रात स्थित विमा संघटना
- तेल कंपन्यांमधील संघटना
- विमान वाहतूक संघटना
- रेल्वे संघटना
- परिवहन संघटना
- व्यापारी संघटना
- वकिल संघटना
- वारकरी संघटना
शिवसेना शिंदे गटाकडून अनोखी रणनिती- (Eknath Shind Vs Uddhav Thackeray)
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंनी विविध समाज, जात किंवा व्यवसायनिहाय असे तब्बल 25 ते 30 सेल शिवसेनेत स्थापन करून मायक्रो मॅनेजमेंटवर भर देण्याच्या सूचना पदाधिकार्यांना दिल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवणे, नागरिकांशी संपर्क वाढवणे आणि संघटनात्मक बळकटी यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ठाण्यात या रणनितीमुळे शिवसेनेला चांगले यश मिळाले होते. त्यामुळेच मुंबईतील निवडणुकीतही त्याच पद्धतीने विजय मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून ही अनोखी रणनिती आखण्यात आली आहे. यात शिंदेंना किती यश मिळतंहे पाहणं महत्वाचं राहिलं.
मुंबईत 2017-2022 दरम्यान शिवसेनेचं बळ- (Total Corporator Shide vs Thackeray)
2017 ला विजय- 84
निकालानंतर अपक्ष प्रवेश-4
मनसे नगरसेवकांचा प्रवेश- 6
2022 नंतर आणखी प्रवेश-5
मुदत संपताना नगरसेवक संख्या- 97
शिवसेना फुटीनंतरचं वास्तव-
ठाकरेंच्या शिवसेनेत- 55
शिंदेंच्या शिवसेनेत- 44