Ulhasnagar Municipal Corporation ठाणे : उल्हासनगर शहराच्या महापौर यांच्यासह 78 नगरसेवक आणि जवळपास एक हजार अधिकारी कर्मचारी कामकाज करत असलेल्या उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालयच (Ulhasnagar Municipal Corporation building) धोकादायक अवस्थेत असल्याची बाब समोर आलीय. तर सध्या सुरू असलेल्या पावसात महापालिका इमारतीची अधिकच दुरावस्था आणि धोकादायक अवस्था दिसून येतेय. मागील आठवड्यात भिवंडीत घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा (Dangerous Building) प्रश्न ऐरणीवर आलाय. उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची माहिती घेतली असता महापालिकेने पावसाळ्यापूर्वी 427 इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आणि यात पालिकेची मुख्य इमारतच धोकादायक असल्याचं पुन्हा उघड झालं. गेल्या दोन वर्षांपासून महापालिका मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधली जातेय. परंतु महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही.
दरम्यान, खरंच ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असाता यावेळी दुसऱ्या मजल्यावरील उपआयुक्तांच्या दालना बाजूलाल धक्कादाययक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासन या गंभीर प्रकरणाची वेळीच दखल घेणार का? हे पाहणं महत्वाचे आहे.
Ulhasnagar Municipal Corporation: मुख्यालयच धोकादायक स्थितीत असल्याचं सत्ताधारी शिवसेनेने केलं मान्य
उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालयच धोकादायक स्थितीत असल्याचं सत्ताधारी शिवसेनेने मान्य केलं. मात्र सरकारी निधीची महापालिकेकडून वाट पाहिली जातेय. दुसऱ्या जागी व्यवस्था झाल्यास लवकरच तिथे स्थलांतर होईल, अशी माहिती सत्तेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवक महेश सुखरामानी यांनीदिलीआहे. मागील वर्षभरापासून आमदार कुमार आयलानी यांच्याकडून महापालिकेच्या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जातोय. उल्हासनगरमध्ये ज्या पद्धतीने धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. तशी घटना इथे होऊ नये अशी भीती स्वतः आमदारांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांसह 78 नगरसेवकांच्या जीवाला धोका असताना देखील हे गंभीरतेने का घेतले जात नाही. असा सवाल उल्हासनगरचेभाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी उपस्थित केलाय.
Ulhasnagar Municipal Corporation: 427 इमारती धोकादायक म्हणून जाहीर
नुकतेच भिवंडी शहरातील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेप्रकरणी अखेर निझामपूर महानगरपालिकेच्या तक्रारीवरून बिल्डिंग मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणतीही आवश्यक परवानगी न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप बिल्डिंग मालक बिलाल अहमद अबूबकर खान याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम करणारा कंत्राटदार अशोक यालाही आरोपी करण्यात आले आहे. दरम्यानयाप्रकरणानंतर उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची माहिती घेतली असता महापालिकेने पावसाळ्यापूर्वी 427 इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आणि यात पालिकेची मुख्य इमारतच धोकादायक असल्याचं पुन्हा उघड झालं.
इतर महत्वाच्या बातम्या
