Thane Municipal Corporation Mayor 2026 ठाणे: ठाणे महापालिकेच्या महापौदपदासाठी शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड (Sharmila Pimpalolkar-Gaikawad) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत. तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील (Krishna Patil) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महापौर दालनात दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली.
महत्वाचे म्हणजे ठाण्याला 5 वर्षांत 4 महापौर आणि 4 उपमहापौर मिळणार आहेत. शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांचं महापौरपद आणि कृष्णा पाटील यांचं उपमहापौरपद फक्त सव्वा वर्षासाठी असणार आहे. त्यानंतर नवीन नगरसेवकांना संधी देण्यात येणार आहे. (Thane Mahanagarpalika Mayor Shivsena-BJP)
ठाण्यात एकनाथ शिंदेंचा नवा फॉर्म्युला- (Thane Municipal Corporation Mayor 2026)
ठाणे महाालिकेसाठी महापौर आणि उपमहापौरपदासाठी नवा फॉर्म्युला ठरला आहे. सव्वा वर्ष महापौरपद आणि उपमहापौरपद असणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात ठाणेकरांना चार महापौर आणि चार उपमहापौर मिळणार आहे. महापौरपदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत, त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी महापौरपदासाठी नवा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड? (Who Is Sharmila Pimpalolkar-Gaikawad)
पत्ता - सी / ३०४, साई श्रध्दा बिल्डींग, गोकुळधाम सी एच एस,
कोपरी कॉलनी, बारा बंगलो जवळ, सिध्दार्थ नगर, ठाणे ४००६०३
जन्मदिनांक २५/०१/१९८२
वैवाहिक स्थिती - विवाहित
भाषा- मराठी, हिंदी, इंग्रजी
कामाचा अनुभव -
शिवसेना नगरसेविका २०१७ ते २०२२ प्रभाग क्र. २०
नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष २०१७ ते २०१९
ठाणे महानगर पालिका शिक्षण समिती सदस्य २०२१ ते २०२२
कोरोना योध्दा पुरस्कार २०२१ ते २०२२
उत्कृष्ट नगरसेविका पुरस्कार २०२५
नगरसेविका कार्यकाळामध्ये केलेली महत्वाची कामे -
महाराष्ट्रातील पहिले छत्रपती संभाजी महाराज शौर्य शिल्प निर्मीती
सिध्दार्थ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमशक्ती चौक
भगवान गौतम बुध्द शिल्प
सिध्दार्थ नगर गौतम बुध्द विहार निर्मीती करता पाठ पुरावा
ठाणे महानगरपालिका अंतिम निकाल (Thane Municipal Corporation Election Result 2026)
एकूण जागा -131
भाजप - 28
शिवसेना (शिंदे) - 75
राष्ट्रवादी (अजित पवार) - 9
मनसे - 0
काँग्रेस - 0
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 1
राष्ट्रवादी (शरद पवार) - 12
एमआयएम - 5
अपक्ष - 1
