Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: विजय घेणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; 6 पक्ष, 5 दिवस अन् 4 बैठका... TVK ने समर्थनासाठी असं जुळवलं समीकरण
Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय आज रविवारी (१० मे २०२६) सकाळी १०:३० वाजता राजधानी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

तामिळनाडू : राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर टीव्हीके (TVK) प्रमुख विजय १० मे रोजी सकाळी १०:३० वाजता राजधानी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालात जनतेचा कौल मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या घडामोडींनंतर अखेर तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाला राज्यात सरकार स्थापन करण्याचा आणि पक्षप्रमुख सी. जोसेफ विजय यांना मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी शनिवारी (९ मे २०२६) टीव्हीके प्रमुख विजय यांना राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय आज रविवारी (१० मे २०२६) सकाळी १०:३० वाजता राजधानी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: विजय यांच्यासाठी सत्तेपर्यंतचा मार्ग सोपा नव्हता
टीव्हीके प्रमुख विजय आज रविवारी (१० मे २०२६) तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, परंतु निवडणूक जिंकल्यानंतर राज्यात सरकार स्थापन करणे आणि सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांच्यासाठी सोपा नव्हता. तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ नंतर ४ मे २०२६ रोजी आलेल्या त्रिशंकू निकालापासून ते १० मे रोजी होणाऱ्या टीव्हीके-नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधीपर्यंत तामिळनाडूच्या राजकारणात अतिशय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये डिलीट केलेले ट्विट, कथित बनावट समर्थन पत्रे आणि शेवटच्या क्षणी बदललेले निर्णय यांसह शनिवारी (९ मे) संध्याकाळपर्यंत चाललेल्या सस्पेन्सचा समावेश होता.
या सस्पेन्समुळे तामिळनाडूचे राज्यपाल आर्लेकर यांना आपला चेन्नई दौराही रद्द करावा लागला आणि अखेर त्यांनी गेल्या आठवडाभरापासून राजभवनाचे (लोक भवन) हेलपाटे मारणाऱ्या टीव्हीके प्रमुख विजय यांची भेट घेतली आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी मंजुरी दिली.
Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: ११ जागांच्या कमतरतेमुळे सुरू झाला सर्व खेळ
टीव्हीकेने २३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण १०८ जागा जिंकल्या, ज्यामुळे २३४ सदस्यांच्या विधानसभेत तो सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. परंतु विधानसभेत बहुमताचा आकडा ११८ होता, म्हणजेच टीव्हीके बहुमतापासून १० जागा मागे होती. विजय दोन जागांवरून निवडून आले असल्याने आणि विधानसभेत ते फक्त एकच मत देऊ शकत असल्याने, टीव्हीकेचे एकूण संख्याबळ १०७ झाले. म्हणजेच बहुमतासाठी ११ आमदारांची गरज होती.
Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: पाच दिवस बैठका, चर्चा आणि सहा पक्षांची युती
टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसाठी बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात आधी काँग्रेस पक्षाने आपल्या पाच आमदारांचे समर्थन जाहीर केले. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (CPI) दोन जागांचे समर्थन दिले आणि त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ने देखील आपल्या दोन जागांचे समर्थन दिले. काँग्रेस, सीपीआय आणि सीपीएमच्या समर्थनानंतर टीव्हीकेच्या युतीचा आकडा ११६ वर पोहोचला, तरीही बहुमत दोन जागा दूर होते. अखेर व्हीसीके (VCK) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) यांनी आपल्या प्रत्येकी दोन आमदारांचे समर्थन देण्याची घोषणा केली; हे पक्ष आधी एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके आघाडीचा भाग होते.
टीव्हीकेसोबत समर्थनाच्या चर्चेनंतर व्हीसीके प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी मध्यंतरी विजय यांच्यावर काँग्रेसशी हातमिळवणी करण्यावरून टीका केली. तसेच, आययूएमएल नेते ए. एम. शहाजहान यांनी सुरुवातीच्या समर्थनाच्या बातम्या फेटाळून लावल्या आणि त्यांनी टीव्हीकेला कोणतेही समर्थन पत्र दिले नसल्याचे सांगितले.
याच दरम्यान, एएमएमके (AMMK) नेते टीटीव्ही दिनकरन यांनी टीव्हीकेवर त्यांच्या पक्षाचे बनावट समर्थन पत्र प्रसिद्ध केल्याचा आरोप केला आणि एआयएडीएमके (AIADMK) नेते एडप्पाडी के. पलानीस्वामी यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: VCK ने टीव्हीकेला समर्थन देणारी पोस्ट केली डिलीट
तर दुसरीकडे, व्हीसीकेने शुक्रवारी (८ मे २०२६) 'X' प्लॅटफॉर्मवर विजय यांना समर्थन देण्याचे पत्र शेअर केले होते, परंतु काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली आणि अकाऊंटही गायब झाले. मात्र, पक्षाने दिलेल्या समर्थनाचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतर व्हीसीके आणि आययूएमएलने शनिवारी (९ मे) संध्याकाळी ५ वाजता टीव्हीकेला औपचारिक समर्थन पत्रे सोपवली आणि टीव्हीकेच्या युतीचा आकडा १२० वर पोहोचला.
Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: साडेसहा वाजता राज्यपालांची भेट
युतीमधील सर्व पक्षांकडून समर्थन पत्रे मिळूनही टीव्हीके प्रमुख विजय यांची अडचण दूर झाली नव्हती, कारण राज्यपाल आर्लेकर शनिवारी संध्याकाळी ७:१० वाजता केरळ दौऱ्यासाठी रवाना होणार होते. मात्र, तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने आणि राज्यात राष्ट्रपती शासन लागू होण्याची भीती असल्याने त्यांनी अचानक आपला केरळ दौरा रद्द केला आणि संध्याकाळी ६:३० वाजता राजभवनात टीव्हीके प्रमुख विजय यांची भेट घेतली.
Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: राज्यपालांच्या चौथ्या भेटीत मिळाले सरकार स्थापनेचे निमंत्रण
गेल्या तीन दिवसांतील विजय यांची राज्यपालांशी ही चौथी भेट होती. यावेळी टीव्हीके प्रमुख १२० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन राज्यपालांना भेटले. दोन तास चाललेल्या बैठकीनंतर राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांनी टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांना तामिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण पत्र दिले.
टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय आज रविवारी (१० मे) सकाळी १०:३० वाजता चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये शपथ घेतील. न्यूज एजन्सी 'एएनआय'नुसार, विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहेत.
Before You Go
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न





















