Thalapathy Vijay Profile:अडथळ्यांचीमालिकापारकरत अखेर तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय हेतामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाच्याखर्चीवरविराजमानझालेआहे. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी शनिवारी टीव्हीकेचे प्रमुख विजय यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी आज (10 मे) चेन्नई येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपालांनी विजय यांना विश्वासदर्शक ठराव मागण्यासाठी 13 मे पर्यंत किंवा त्यापूर्वीची मुदत दिली. अशातच, सिनेसृष्टीतील साऊथचा सुपरस्टार (South Superstar) तेराजकीयपटलापर्यंतच्या थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्याप्रवासानेसारेचचकितझालेआहे. पहिल्यांदाच निवडणुक लढवणाऱ्या थलपती विजय याच्या पक्षानं प्रस्थापितांना धूळ चारली. शिवायमुख्यमंत्रीपदाचीमाळदेखीलआपल्यागळ्यातघातलीआहे. परिणामी 'तमिळगा वेत्री कळघम' (Tamilaga Vettri Kazhagam) या नवख्या पक्षानं सर्वाधिक जागा मिळवून सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. दरम्यान टीव्हीकेचे प्रमुख थलपती विजय हेनेमकेआहेतरीकोण? असाप्रश्नसाऱ्यांनापडलाआहे, चलातरमगत्याबद्दलजाणूनघेऊ.

Continues below advertisement

Thalapathy Vijay : कोण आहेत विजय थलपती?

विजय थलपती उर्फ जोसेफ विजय यांचा जन्म 22 जून 1974 रोजी झाला. विजय यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून सुरुवात केली आणि पुढे आघाडीचे सुपरस्टार अभिनेता म्हणून मोठे नाव कमावले. विजय यांच्या अभिनयामुळे आणि जनसामान्यांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना “थलपती” म्हणून ओळखले जाते. अनेक यशस्वी चित्रपटांमधून त्यांनी सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला. पुढे विजय यांनी राजकारणात प्रवेश करत Tamilaga Vettri Kazhagam या पक्षाची स्थापना केली. जनतेसाठी शिक्षण, रोजगार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. अभिनेता ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास तमिळनाडूमधील तरुणांसाठी प्रेरणादायी मानला जातो.

Continues below advertisement

Thalapathy Vijay TVK : विजयने पक्षाची स्थापना कधी केली?

पहिल्याचप्रयत्नातअभूतपूर्वयशमिळवणाऱ्या थलापती विजय यांनी आपल्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) या पक्षाची स्थापना 2 फेब्रुवारी 2024 रोजी केली होती. याच पक्षातून त्याने अनेकांनाराजकारणाच्यामैदानातउतरवत स्वतःच्याही राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. या पक्षाचे मुख्यालय चेन्नईमध्ये आहे. विजयने तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक, मुख्यमंत्री स्टॅलिन आणि भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली असून आजच्या रॅलीत अपघात झाला आहे.

Thalapathy Vijay : जोसेफ विजय यांची चित्रपट कारकीर्द

आपल्या चाहत्यांमध्ये 'थलपथी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयने राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द घडवली. किंबहुना, चित्रपट हे त्याच्या विशाल आर्थिक साम्राज्याचा केवळ एक भाग आहेत. त्याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, विजयची एकूण संपत्ती अंदाजे ₹624 कोटी आहे.

Thalapathy Vijay Net Worth: रिअल इस्टेट ही त्याच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक

विजयच्या संपत्तीचा एक मोठा भाग चेन्नई आणि आसपासच्या परिसरातील रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून येतो. नीलंकराई, सालिग्रामम आणि मायलापूर यांसारख्या भागांमध्ये त्याच्या मालकीचे अनेक आलिशान बंगले आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांचे एकूण मूल्य अंदाजे ₹220 कोटी आहे. वैयक्तिक मालमत्तांच्या मालकीव्यतिरिक्त, विजय 'जया प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड'चा व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम करतो.

Thalapathy Vijay Bnak Balance : मोठ्या बँकमध्ये ठेवी

विजयच्या आर्थिक प्रोफाइलमधील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे बँक ठेवी आणि मुदत ठेवींमध्ये असलेली मोठी रक्कम. विजयच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या तपशिलानुसार, विविध बँकांमध्ये त्याच्या ₹313 कोटींहून अधिक ठेवी आहेत. या ठेवींवर मिळणारे व्याज त्याच्या नियमित उत्पन्नात महत्त्वपूर्ण योगदान देते.

Thalapathy Vijay: ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळणारी कमाई

राजकारणात पूर्णपणे प्रवेश करण्यापूर्वी, विजय हा दक्षिण भारतातील सर्वात व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान कलाकारांपैकी एक होता. गेल्या काही वर्षांत, तो अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसला आहे. त्याने कोका-कोला, टाटा डोकोमो आणि सनफीस्ट यांसारख्या कंपन्यांसोबतच्या एंडोर्समेंट करारांमधून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल - एकूण 234 (Tamilnadu Election Result 2026)TVK (विजय) - 108DMK - 59AIADMK - 47काँग्रेस - 5PMK - 4मुस्लिम लिग - 2कम्युनिस्ट पक्ष - 2VCK - 2मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 2

अखेर तामिळनाडूत सत्तास्थापनेचा तिढा सुटला, एका रात्रीत काय घडलं? (Tamilnadu Election Result 2026)

विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेकडे सुरुवातीला 108 जागा होत्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा 10 ने कमी होत्या. आपली पहिली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, टीव्हीकेने सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा मिळवण्याकरिता डीएमकेचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीके यांच्याकडे संपर्क साधला. किंबहुना, दोन जागा जिंकलेल्या विजय यांना त्यापैकी एक जागा सोडावी लागणार होती. यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या 107 पर्यंत कमी होणार होती. टीव्हीकेला पाठिंबा देणाऱ्या पक्षांपैकी काँग्रेसकडे पाच आमदार आहेत, तर सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीकेकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. अखेर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता 120 वर पोहोचलंय. हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 ने जास्त आहेत. त्यामुळे विजय थलपतींचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

इतर महत्वाच्या बातम्या