Tejas Thackeray: तेजस ठाकरेंना आठवडाभराच्या उपचारानंतर रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज; ‘मातोश्री’वर परतले
Tejas Thackeray: तेजस ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बुधवारी गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Tejas Thackeray: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांना आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज एच.एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली असून ते ‘मातोश्री’ निवासस्थानी परतले आहेत.
Tejas Thackeray: बुधवारी प्रकृती बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल
बुधवारपासून तेजस ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना गिरगाव येथील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. त्यांना इन्फेक्शन झाल्यामुळे प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले. आठवडाभर निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
Who is Tejas Thackeray: कोण आहेत तेजस ठाकरे?
तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे धाकले पुत्र आहेत. ते शिवसेनेच्या काही कार्यक्रमांना आणि प्रचारात उपस्थित राहतात, मात्र त्यांनी अधिकृतपणे सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला नाही. तेजस ठाकरे हे वाइल्डलाइफ रिसर्चर आणि फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात. वन्यजीव क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. तामिळनाडूत भारतीय संशोधन पथकाने शोधलेल्या गेकोच्या नव्या प्रजातीला तेजस ठाकरेंच्या नावावरून नाव देण्यात आले आहे.
उष्ण भागात आढळणारी आणि रात्री सक्रिय असलेली ही प्रजाती त्यांच्या संशोधन कार्याची दखल म्हणून नामकरण करण्यात आली होती. तेजस ठाकरे यांना ‘TT’ असेही संबोधले जाते.2012 साली, लहान वयातच त्यांनी अंबोली येथे पहिली हर्पिंग ट्रिप घेतली होती. या ट्रिपदरम्यान एका माशाची नवीन प्रजाती सापडली, ज्याचे नाव पुढे ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ असे ठेवण्यात आले.
2017 मध्ये त्यांनी अंबोली येथे या माशाचे शास्त्रीय डॉक्युमेंटेशन करण्यासाठी सर्व अधिकृत परवानग्या घेतल्या. 2021 मध्ये, कोविड लॉकडाऊनच्या काळात, या संशोधनाची संपूर्ण प्रक्रिया जाहीर करण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिस्तुरा हिरण्यकेशीला बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला होता. आतापर्यंत तेजस ठाकरे यांनी 60 हून अधिक प्रजातींचा शोध लावल्याची नोंद आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या

























