चेन्नई : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अभिनेता थलपती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK)  पक्षाभोवती (Tamil Nadu Government Formation) सत्तास्थापनेची समीकरणे वेगाने फिरू लागली आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसनंतर आता भाजपही तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची सत्ता यावी, अशी भूमिका घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, भाजपला विजय यांच्या पक्षाने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करू नये, असे वाटत असल्याने त्यांनी आता एआयएडीएमकेवर टीव्हीकेसोबत जाण्यासाठी दबाव टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.(Tamil Nadu Government Formation)

Continues below advertisement

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडे सध्या १०८ आमदार आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी ११८ आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे विजय यांच्या पक्षाला आणखी १० आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे.दरम्यान, भाजपने अचानक या सत्तासमीकरणात एंट्री घेतल्याने तमिळनाडूच्या राजकारणात नवे वळण मिळाले आहे. भाजप आता एआयएडीएमकेने थलपती विजय यांच्या टीव्हीकेसोबत युती करावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

Tamil Nadu Government Formation : तमिळनाडूतही काँग्रेसला सत्तेत स्थान मिळू नये, अशी भाजपची रणनीती

भाजपच्या या भूमिकेमुळे एआयएडीएमकेमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याची माहिती आहे. पक्षात दोन गट पडल्याचे चित्र असून, काही नेते विजय यांच्या पक्षासोबत जाण्याच्या बाजूने आहेत, तर काही नेते या युतीला विरोध करत आहेत. त्यामुळे एआयएडीएमकेमध्ये फुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, भाजपला तमिळनाडूमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने टीव्हीकेची सत्ता स्थापन व्हावी असे अजिबात वाटत नाही. कारण, केरळमध्ये काँग्रेसने दमदार पुनरागमन केल्यानंतर तमिळनाडूतही काँग्रेसला सत्तेत स्थान मिळू नये, अशी भाजपची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप एआयएडीएमके आणि टीव्हीके यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, अशी भूमिका घेत आहे.

Continues below advertisement

Tamil Nadu Government Formation TVK chief Vijay:  सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची साथ आवश्यक

तमिळनाडू विधानसभा २३४ सदस्यांची आहे. सरकार स्थापनेसाठी ११८ जागांचे बहुमत आवश्यक आहे. टीव्हीकेने १०८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची साथ आवश्यक ठरणार आहे. काँग्रेसचे पाच विजयी उमेदवार टीव्हीकेला पाठिंबा देण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तरीही विजय यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही.

भाजपच्या या नव्या डावपेचामुळे एआयएडीएमकेमध्ये मोठे राजकीय धर्मसंकट निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री एआयएडीएमकेच्या वरिष्ठ नेत्या लीमा रोज मार्टिन यांनी सार्वजनिकरित्या टीव्हीके आणि एआयएडीएमके यांच्यात चर्चा सुरू असल्याचे मान्य केले. लीमा रोज मार्टिन या ‘लॉटरी किंग’ यांच्या पत्नी असून त्यांचा मुलगा पुडुचेरीमधून आमदार आहे आणि एनडीएचा भाग आहे. त्यामुळे एआयएडीएमकेमधील एक गट भाजपच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, टीव्हीकेचे संस्थापक थलपती विजय यांनी सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी पक्षाच्या विजयी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवडही होण्याची शक्यता आहे. तसेच विजय यांनी जिंकलेल्या दोन जागांपैकी एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचेही सांगितले जात आहे.तमिळनाडूमधील या नव्या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील सत्तासमीकरण अधिकच रंगतदार बनले असून, अखेर विजय कोणासोबत हातमिळवणी करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Tamil Nadu Government Formation : DMK आणि AIADMK यांच्यात गुप्त चर्चा?

थलापती विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी तामिळनाडूतील दोन पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी, DMK आणि AIADMK यांच्यात गुप्त चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणात हे दोन पक्ष नेहमीच एकमेकांचे कट्टर विरोधक राहिले आहेत, त्यामुळे ही संभाव्य युती ऐतिहासिक ठरू शकते. 2019 मध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याने महाराष्ट्रात नव्हे देशात खळबळ उडाली होती. त्यामुळे तोच प्रयोग होणार का? याची चर्चा रंगली आहे. 

Tamil Nadu Government Formation : दोन्ही पक्षांच्या जागांचे समीकरण

तमिळनाडू निवडणुकीत DMK ला 59 आणि AIADMK ला 47 जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आले, तर त्यांच्या आमदारांची एकूण संख्या 106 होईल, जी बहुमताच्या (118) आकड्यापेक्षा अजूनही 12 ने कमी आहे. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेसाठी इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागेल. दुसरीकडे, 'विदुथलाई चिरुथाईगल कात्ची' (VCK) आणि डाव्या पक्षांसारख्या छोट्या पक्षांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे पक्ष सध्या DMK च्या नेतृत्वाखालील युतीचा भाग आहेत आणि DMK ला विश्वास आहे की ते विजय यांच्या बाजूने जाणार नाहीत.

Tamil Nadu Government Formation : 234 सदस्यीय विधानसभेत टीव्हीकेकडे 108 आमदार

दुसरीकडे, विजय यांनी बुधवारी लोक भवनात राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तथापि, विजय यांनी केवळ 113 आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर केली. राज्यपालांनी 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राची मागणी केली. विजय यांनी आपला पाठिंबा सादर करण्यासाठी वेळ मागितला. 234 सदस्यीय विधानसभेत टीव्हीकेकडे 108 जागा आहेत. विजय यांनी दोन जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे एक जागा गमावल्यास एकूण संख्या 107 होईल. 233 जागांसहही बहुमत 118 राहील, त्यामुळे टीव्हीकेला आणखी 11 आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे.