Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: पश्चिम बंगालच्या (West Bengal) राजकीय इतिहासात आज एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर झालेल्या एका भव्य सोहळ्यात राज्यपाल आर. एन. रवि यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशातील दिग्गज नेते उपस्थित होते.

Continues below advertisement

Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: ममता बॅनर्जींच्या सत्तेचा अंत

या विधानसभा निवडणुकीत भाजपने 293 पैकी 207 जागांवर प्रचंड विजय मिळवून पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. तर 15 वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले. स्वतः शुभेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव करत 'जायंट किलर' ठरले होते.

Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: दिग्गजांची उपस्थिती आणि खास रथ

शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शुभेंदू अधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य एका विशेष रथावरून व्यासपीठाकडे रवाना झाले. यावेळी मोदींनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या सहकाऱ्यांचे आशीर्वाद घेतले, तसेच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचीही भेट घेतली.

Continues below advertisement

या सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन नवीन, योगी आदित्यनाथ यांच्यासह महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सुमारे 20 राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याचे साक्षीदार बनले.

Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: 9 वे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारली

शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे 9 वे मुख्यमंत्री बनले आहेत. शुक्रवारीच अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

West Bengal CM Oath Ceremony: शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत कोणत्या नेत्यांनी शपथ घेतली?

आज, शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत इतर पाच नेत्यांनी शपथ घेतली. यामध्ये दिलीप घोष, अग्निमित्र पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि निसिथ प्रमाणिक यांचा समावेश आहे.

आणखी वाचा

Narendra Modi Eknath Shinde Meet Suvendu Adhikari Oath West Bengal: बंगालच्या मंचावर एकनाथ शिंदेंजवळ थांबून मोदींच्या गप्पागोष्टी, शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीपूर्वी स्टेजवर हास्यकल्लोळ, VIDEO

Sanjay Raut on Suvendu Adhikari: 'भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा राखली'; बंगालमध्ये शुभेंदू अधिकारींच्या निवडीवरून संजय राऊतांचा घणाघात