नाशिक : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी आमदार दीपक केसरकर, रुपाली चाकणकर आणि अशोख खरात यांचे फोटो शेअर करत गंभीर आरोप केले होते. एमआयडीसीमध्ये मंत्र्यांचं काय काम, त्यातच महिला आगोयाच्या अध्यक्षा आणि अशोक खरात (Ashok Kharat) यांचाही तिथे सत्कार होतो, असे म्हणत सुषमा अंधारेंनी काही फोटो शेअर केले होते. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध? आणि तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या? असे प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केले होते. आता, अंधारेंच्या आरोपावर सिन्नर आद्योगिक वसाहतीचे (MIDC) चेअरमन नामकर्ण आवारे यांनी पलटवार केला आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परषद घेऊन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे सिन्नर एमआयडीसीशी संबंधित एका कार्यक्रमातील फोटो दाखवले. शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध? आणि तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या बॅनरवर 'सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित' असे लिहिले असून, तिथे कॅबिनेट मंत्री शांत उभे आहेत आणि रुपाली चाकणकर यांचा सत्कार खरातच्या उपस्थितीत होत आहे, यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. आता, या संस्थेच्या चेअरमनकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहत महाराष्ट्रातील नामवंत व एक नंबरची संस्था असून संस्थेच्या स्थापनेपासूनच सिन्नर शिर्डी मार्गाने जाणाऱ्या सगळ्याच मंत्र्यांना आम्ही आमंत्रित करत असतो. संस्थेला सदिच्छा भेट आणि संस्थेच्या समस्या माहिती करुन देण्यासाठी आम्ही निमंत्रण देत असतो. त्याच अनुषंगाने 2023 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर सिन्नर तालुक्यात आले असताना आम्ही निमंत्रण दिलं होते, असे आवारे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. त्यावेळी त्यांच्यासमवेत रुपाली चाकणकर देखील होत्या, त्यामुळे त्यांचाही सत्कार आम्ही केला. आम्ही मंत्र्यांना निमंत्रण देतो, त्यांच्याबरोबर कोण येणार हे आम्हाला माहीत नसतं. मात्र, त्यांच्यासोबत आल्यावर त्यांचाही सन्मान करणं हे क्रमप्राप्त असल्याचंही आवारे यांनी सांगितले.
आमच्या औद्योगिक वसाहतीत अशोक खरात यांची कोणताही कारखाना नाही, ते सभासद देखील नाहीत. इतकच नव्हे तर त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर देखील कोणतीही गुंतवणूक समोर आलेली नाही. आमच्या शेजारी असणाऱ्या शासकीय माळेगाव औद्योगिक वसाहतीत देखील त्यांची गुंतवणूक नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. गेल्या दहा-वीस वर्षांत तरी अशी गुंतवणूक केल्याचं आढळून आलेला नाही, अशी माहिती नामकर्ण आवारे यांनी दिली.
संस्थांवर नाहक प्रश्नचिन्ह उभा राहतंय
अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक गोष्टी घडत आहेत, मीडियाने त्याचा पाठपुरावा करावाच. मात्र, त्यांच्याकडून काहीजण खासगी संस्था आणि व्यक्तिगत टीका करत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून उभा असलेल्या संस्थांवर प्रश्नचिन्ह तयार झाले. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करूनच त्यावर भाष्य केले पाहिजे अशा गोष्टींमुळे मुख्य आरोपी बाजूला राहून लक्ष विचलित होतं, अशी खंत देखील आवारे यांनी उपस्थित केली.
केसरकर, चाकणकर यांची चौकशी करा
रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणात एका कंपनीत भागीदारी आहे. हे चौधरी नाव महत्त्वाचे आहे कारण ते तटकरे (अदिती तटकरे किंवा सुनील तटकरे यांच्या संदर्भात) यांच्यासोबत अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहेत. यावरून अंधारे यांनी 'A=B=C' असे समीकरण मांडले आहे. दीपक केसरकर आणि चाकणकर यांचे फोन रेकॉर्ड अर्थिक खाते चेक करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. तसेच, चौधरी जे तटकरे सोबत अनेक व्यवहारत ते कोकणात चाकणकर यांच्यां सोबत आहेत. साडेचारशे पाचशे कोटीचा प्रोजेक्ट आहे, येवढी ताकद कुठून येते, असा सवालही अंधारेंनी केला आहे.
हेही वाचा
आधी रुपाली चाकणकरांची पाठराखण करणाऱ्या दत्तामामा भरणेंचा सूर एकदम बदलला, म्हणाले, 'त्यावेळी मला...'
