एक्स्प्लोर

Sushma Andhare on Aniket Tatkare: सुनेत्रा पवारांच्या ड्रायव्हरला अचानक खाली उतरवून सुनील तटकरेंच्या मुलाने स्वत: स्टेअरिंग हातात घेतलं, सुषमा अंधारेंकडून सुरक्षाव्यवस्थेत हलगर्जीपणाचा आरोप

Sushma Andhare on Aniket Tatkare: सुनेत्रा पवारांच्या गाडीत असलेल्या शासकीय चालकाला गाडीतून उतरवून अनिकेत तटकरे यांनी स्वतः गाडीचं स्टेअरिंग हाती घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.

Sushma Andhare on Aniket Tatkare: चिपळूण येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) सावर्डे येथे उपस्थित राहिल्या होत्या. त्या खासगी हेलिकॉप्टरने सावर्डेपर्यंत आल्या आणि तेथून पुढे विवाहस्थळापर्यंत चारचाकी गाडीतून गेल्या. मात्र, या प्रवासादरम्यान एक वेगळीच बाब समोर आली आहे. गाडीत असलेल्या शासकीय चालकाला खाली उतरवून अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी स्वतः गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाची घटना घडलेली असल्याने सुरक्षा आणि प्रोटोकॉलच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अनिकेत तटकरेंनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे सांगत विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. आता या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

Sushma Andhare on Aniket Tatkare: नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?   

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने हलगर्जीपणा केला जात आहे. अनिकेत तटकरे यांनी प्रोटोकॉल तोडला आहे. सुनील तटकरे यांचे चिरंजीव म्हणून त्यांना विशेष प्राधान्य दिले जाते का? सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेबाबत असा हलगर्जीपणा होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरे यांची देखील चौकशी झाली पाहिजे. तटकरे यांना जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. 

Aniket Tatkare: अनिकेत तटकरेंचं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणावर अनिकेत तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अनिकेत तटकरे म्हणाले की, आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या लग्नासाठी काकी काल सावर्डे येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचे मी सारथ्य मी केले. याआधीही अनेक वरिष्ठ नेत्यांचे सारथ्य केले आहे. त्यामुळे कारण नसताना हा वाद का वाढवला जातोय. हे माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे आहे. राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्य येतात, त्यांचं स्वागत करणे, सारथ्य करणे यात गैर वाटत नाही. सुनेत्रा पवार ज्या वाहनाने विवाहस्थळापर्यंत पोहोचल्या ते शासकीय वाहन नव्हते. त्यामुळे त्यात शासकीय चालक देखील नव्हता. काकी येणार म्हणून मी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्ही एक खासगी वाहन उपलब्ध केले होते. याआधी दादांकरता देखील असे नियोजन आम्ही करत होतो. त्यामुळे खासगी वाहनात चालक म्हणून बसणे यात मला गैर वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आणखी वाचा 

Minority Status Certificates: अजित पवार हयात असतानाच 'तो' निर्णय, अल्पसंख्याक विभागाचा दावा; 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात नवा ट्विस्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
Embed widget