Sushma Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांचा जोरदार धडाका लावलाआहे. यावेळीसोलापूर (Solapur News) जिल्ह्यातीलप्रचारसभेतबोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सुषमा अंधारे यांनीजोरदार हल्लाबोल केलाय. सबतचदिवंगतउपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरून (Ajit Pawar Death News) सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय उडान नियामक मंडळाने एक वर्षांपूर्वी बंदी घातलेले विमान अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रवासासाठी का वापरले? अजितदादा स्वतःची एवढी काळजी घेत होते ते हे विमान कसं वापरतील? असाप्रश्नही सुषमा अंधारे यांनीयावेळीउपस्थितकेलाय. (Solapur News)
Sushma Andhare on BJP : अजित पवारांचा घातपात झालाय, प्रश्नविचारलातरभाजपलारागका?
मी प्रचाराचं काही बोलणार नाही, सोन्यासारखा माणूस आपल्यातूननिघून गेलाय. दादा राज्याची संपत्ती होती. ते म्हणतात ना लाख जावो पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे त्यामुळे हा प्रश्न विचारायचा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला हक्क आहे. दादांच्या विमान अपघाताबाबत माहिती उडान नियामक मंडळाने द्यायला हवी. मात्र भाजपच वेगळी उत्तरे देत आहेत. अनेक प्रश्न अनुत्तरीत असून ठोस उत्तर कोणाकडून मिळत नाहीये. अजित पवारांचा घातपात झालाय, असे प्रश्न उपस्थित होत आहे. याचा भाजपला का राग येतोय? असाहीखोचकसवाल सुषमा अंधारे यांनीयावेळीउपस्थितकेलाय.
Sushma Andhare : गावच्या गणपती मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठी सुद्धा पालकमंत्री बैठक घेताय का?
पालकमंत्री जयकुमार गोरे पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत असतील तर गावच्या गणपती मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठी सुद्धा पालकमंत्री बैठक घेताय का असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावलाय.
Sushma Andhare : विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना नोटीस
दुसरीकडे, विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची बुधवार आणि गुरुवार दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार आहे. दोन प्रकरणांवर ही बैठक पार पडणार आहे. ज्यामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यात बैठकीसाठी गुरुवारी हजर राहण्याचे समितीकडून आदेश देण्यात आले आहेत. अशात, गुरुवारी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हजर राहणार का? हे बघणं महत्त्वाचे असेल. कुणाल कामराकडून एकनाथ शिंदेंविरोधात गाणं बनवलं होतं, तर त्याला अंधारेंकडून समर्थन देत शिंदेंवर टीका केली होती.
