Raj Thackeray & Sushil Kedia: मराठी शिकणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडियाची ही पहिलीच वेळ नव्हे, यापूर्वी उडवली होती महात्मा गांधींची खिल्ली
Sushil Kedia on Marathi Issue : मराठी शिकणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडियाची ही पहिलीच वेळ नव्हे, तर केडिया यांनी यापूर्वी ही महात्मा गांधींची खिल्ली उडवली होती.

Raj Thackeray & Sushil Kedia: शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची फार मोठी इच्छा होती की उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं. मात्र ती इच्छा त्यांना हयातीत पूर्ण करता आली नाही. दोघं कधीच राजकीयदृष्ट्या एकत्र आले नाहीत. मात्र त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS-Shivsena UBT Melava) यांचा एकत्रितपणे आज 5 जुलै रोजी विजयी मेळावा साजरा होत आहे. मुंबईतील वरळी डोम येथे हा एकत्रित भव्य मेळावा होणार आहे. अशातच विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. आज सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोमला पोहोचतील.
दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भायंदर येथे एका स्वीट मार्ट मालकाला मारहाण केल्याने वाद निर्माण झाला असून व्यापाऱ्यांनी एकत्र येत मनसेच्या (MNS) दडपशाहीला विरोध दर्शवला आहे. तर, दुसरीकडे शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया यांनी ट्विट करुन राज ठाकरेंना डिवचलं होतं. मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मला मराठी (Marathi) येत नाही, बोल क्या करना है, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर, एबीपी माझावर आपली बाजू मांडण्यासाठी आलेल्या केडिया यांनी मराठीत प्रश्न विचारताच पळ काढला. मात्र मराठी शिकणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडियाची ही पहिलीच वेळ नव्हे, तर केडिया यांनी यापूर्वी ही महात्मा गांधींची खिल्ली उडवली होती.
महात्मा गांधींची उडवली होती खिल्ली
उद्योजक सुशील केडिया यांनी एक व्हिडिओ शेयर करत त्यात 2000 रुपयांच्या नवीन नोटेवर चुकून पतंजली हेअर ऑइलचे चित्र पडले. असा मजकूर लिहीत त्यावर महात्मा गांधींच्या डोक्यावर केस असल्याचे दाखवत खिल्ली उडवली होती. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला होता. अशातच केडिया यांनी पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर भाष्य करत नव्या वादाला तोंड फाडलंय.
सुशील केडिया कोण?
सुशील केडिया हे नाव शेअर मार्केटशी निगडीत असून ते अनुभवी गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केटमधील 'केडियोनॉमिक्स' कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. सेबी (SEBI) नोंदणीकृत ट्रेडिंग आणि सल्लागार अशी त्यांची फर्म आहे. शेअर बाजारातील अनुभवामुळे ते अनेकदा विविध आर्थिक वृत्तवाहिन्यांवर विश्लेषक म्हणून भूमिका बजावतात, बाजू मांडतात. केडिया यांनी 25 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँका तसेच दोन मोठ्या हेज फंडांमध्ये काम केले आहे. सुशील केडिया यांच्याकडे असलेल्या 45 कंपन्यांमधील शेअर्सचे जून 2025 पर्यंतचे एकूण मूल्य 3,103 कोटींहून अधिक आहे.
हे ही वाचा























