प्रदेशाध्यक्षांनी जेवायला बोलावलं अन् अचानक धनंजय मुंडे तिथं आले, सुरेश धसांचे अवघ्या 2 तासांत सूर बदलले
Suresh Dhas, Beed : प्रदेशाध्यक्षांनी जेवायला बोलावलं अन् अचानक धनंजय मुंडे तिथं आले, सुरेश धसांचे अवघ्या 2 तासांत सूर बदलले

Suresh Dhas, Beed : "भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मला जेवायला बोलावलं होतं. मी तिथे गेलो होतो, अचानकपणे तिथे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) साहेब तिथे आले. आमच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली", असं भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी स्पष्ट केलं. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या भेटीबद्दलच्या बातम्या आल्यानंतर सुरेश धस यांनी बीडमध्ये दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केलाय.
15 ते 20 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेची भेट झाली
सुरेश धस म्हणाले, प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, त्यांच्याकडून काही सांगण्यात चूक झाली असेल. परंतू त्यांनी आम्हाला हे मिटतंय का? अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं. मी क्लिअरकट त्यावेळीच सांगितलं होतं. त्यावेळी ते मनभेद नाहीत, मतभेद आहेत, असं म्हणाले आहेत. आमच्यामध्ये मतभेद आहेतच ना.. या प्रकरणाच्या बाबतीत मी माघार घेणार नाही. हे मी त्या बैठकीत क्लिअर सांगितलं. ही बाब पंधरा-वीस दिवसांपूर्वीची आहे.
सुरेश धस यांचे भेटीबाबत मोठे खुलासे
पुढे बोलताना धस म्हणाले, मी जे पर्वा त्यांना भेटायला गेलो. एखाद्या माणसाला रात्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणलंय म्हटल्यानंतर आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो. यांच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कोणतीही चर्चा नाही. तिथून परत आल्यानंतर पर्वा रात्री भेटलो. त्यानंतर मी आणखी एक काम केलंय. 73 कोटींच्या बोगस घोटाळ्याचं पत्र मी अजित पवार यांच्याकडे पाठवलं आहे. काल मी स्वत: कृषी कार्यालयात गेलो होतो. तेथील घोटाळ्याची मी कागदपत्र घेतली होती. आज देखील मी धनंजय देशमुख यांच्याशी बोललो आहे. मी मुंडे यांची भेट घेतली असली तरी संतोष देशमुख प्रकरणात मी लढत राहिल. मनोजदादा आमचं दैवत आहे, गडबडीत काहीतरी बोलले असतील. मी त्यांच्याशी बोलेन.
आज ही संतोष देशमुख यांच्या पत्नीला नोकरीला लावतो म्हणून प्रलोभन दिल आहे, ते कळत आहे, पण अस जर कुणी प्रलोभन देत असेल तर ते योग्य नाही..मला कळलं आहे कुणी त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयन्त करतोय...जर मुखमंत्री जर त्यांना शासकीय नोकरी दिली तर आम्ही विचार करू..मात्र कुणी आमिष दाखवून नाही, असंही धस यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























