Beed: राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. यात धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती झालीय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेश धस यांना डावलण्यात आले आहे.. मुख्यमंत्र्या शी चांगलीच जवळीक असलेल्या सुरेश धस (Suresh Dhas) यांना यापेक्षा मोठ्या पदाची संधी दिली जाणार असल्याची ही चर्चा चालू आहे राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात. यात महायुतीत भाजपच्या वाटेला 11 समित्या आल्या आहेत. या समित्यांवरील अध्यक्षांची निवड भाजपाकडून करण्यात आली. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाटेला आलेल्या समितींची घोषणा बाकी आहे. दरम्यान भाजपला मिळालेल्या समित्यांपैकी धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्ष म्हणून आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्या ऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी दिली होती. (Namita Mundada)
भाजपच्या वाटेला 11 समित्या, मित्र पक्षांच्या नियुक्त्या होणे बाकी
राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात .यात महायुतीत भाजपच्या वाटेला 11 समित्या आल्या आहेत .या समितांवरील अध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात आली .अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाटेला आलेल्या समित्यांची घोषणा होणे बाकी आहे . राज्याच्या एकूण 29 विधिमंडळ समित्यांपैकी 11 महत्त्वाच्या समित्यांवर भाजपने आपल्या आमदारांचं नाव कोरलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडे 9 - 9 समिती असतील असं सांगितलं जात आहे . दरम्यान भाजपला मिळालेला समित्यांपैकी धर्मदाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली आहे .यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी देण्यात आली होती .
कोणत्या 11 समित्यांवर भाजप आमदारांची वर्णी?
- सार्वजनिक उपक्रम समिती- राहुल कुल
- पंचायत राज समिती- संतोष दानवे-पाटील
- आश्वासन समिती- रवी राणा
- अनुसूचित जाती कल्याण समिती- नारायण कुचे
- अनुसूचित जमाती कल्याण समिती- राजेश पाडवी
- महिला हक्क आणि कल्याण समिती- मोनिका राजले
- इतर मागासवर्गीय कल्याण समिती- किसन कथोरे
- मराठी भाषा समिती- अतुल भातखळकर
- विशेष हक्क समिती: राम कदम
- धर्मादाय खाजगी रुग्णालय चौकशी समिती- नमिता मुंदडा
- आमदार निवास व्यवस्था समिती- सचिन कल्याणशेट्टी
हेही वाचा
मोठी बातमी: नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम
