Supriya Sule on Vidyanand Bapat attack in Pune: पुण्यात (Pune) गणेशोत्सव (Ganeshotsav) आणि सार्वजनिक सणांमध्ये डीजे (DJ) तसेच लाऊडस्पीकरच्या दणदणाटाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांना थेट मारहाण केली. या घटनेनंतर संपूर्ण पुण्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रमक भूमिका घेत या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे.

Continues below advertisement

Supriya Sule on Vidyanand Bapat attack in Pune: 'या गलिच्छ प्रवृत्तीमागे...'

सुप्रिया सुळे एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या की, या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करते. माझं विद्यानंद बापट यांच्याशी सविस्तर बोलणं झालं आहे. मी स्वतः माझ्या ओळखीतले वकील त्यांच्या मदतीला तातडीने पाठवत आहे. ही गलिच्छ प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, सातत्याने यात पुण्याची बदनामी होत आहे. राज्याची देखील बदनामी होत आहे. या गलिच्छ प्रवृत्तीच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे? एखादी व्यक्ती जर आपले मत मांडत असेल तर तुम्ही त्याला येऊन मारहाण करणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी याचा जाहीर निषेध करते. माणुसकीच्या नात्याने आम्ही बापटांच्या मागे ताकदीने उभे राहणार," असे त्यांनी म्हटले आहे. 

Vidyanand Bapat: हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट काय म्हणाले?

दरम्यान, विद्यानंद बापट यांनी त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विद्यानंद बापट म्हणाले की, तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...चिप प्रसिद्धीसाठी हल्ला केला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का? उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

आणखी वाचा

Vidyanand Bapat Marathi News: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!