एक्स्प्लोर

Supriya Sule On NCP: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजितदादांसोबत काय बोलणं झालेलं?; सुप्रिया सुळेंनी अखेर मनातलं सगळं सांगितलं!

Supriya Sule On NCP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

Supriya Sule On NCP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. माझं आणि माझ्या दादामध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली होती. आमचं जे बोलणं झालं होतं ते अजितदादांना माहीत होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Supriya Sule On NCP Merger)

बहिण-भावामध्ये बोलणं झालं होतं ते आमच्यात आहे आणि ते वास्तव असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अनेकांना विलिनीकरणाबाबत बऱ्याचं गोष्टी माहीत आहेत. मात्र अनेकांना मी बोललेलं आवडत नाही. पण आज काही नेते बोलत नाहीत, असंही विधानही सुप्रिया सुळेंनी केलं. (Supriya Sule On NCP)

एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद- सुप्रिया सुळे (Supriya Sule On Sunetra Pawar)

मी आणि सुनेत्रा वहिनी यापुर्वीही डीपीडीसीला एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर ही नवीन जबाबदारी आहे. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. मात्र अजितदादा नसल्याचं दुःखही आहे. अजितदादा नसण्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही. आजही खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही. आमचं कुटुंब सध्या अडचणीतून जात आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

शरद पवारांची तब्येत खूप चांगली- सुळे (Supriya Sule On Sharad Pawar)

शरद पवारांची तब्येत खूप चांगली आहे. रूबी हॉल रूग्णालयाच्या स्टाफचे मी आभार मानते. शरद पवारांना उद्या रुग्णालायातून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधे होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केले होते. अजितदादानंतरच्या काळातही या सगळ्यांनी आमची साथ दिली त्याबद्दलही मी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

विलिनीकरणावर अजितदादा आणि माझ्यात बोलणं झालं होतं, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, Video: 

संबंधित बातमी:

Supriya Sule On Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक, अखेर आव्हाड यांच्याकडून सभागृहाची माफी
जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक,अखेर सभागृहाची माफी
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Share Market : शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 75 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
Embed widget