Supriya Sule : राज्यभरातआज प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026)निमित्यानेविविधकार्यक्रमाचेआयोजनकरण्यातआलंय. अशातच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या दिग्गजांना आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याच मुद्यावरुन राजकीयवातावरणतापलंअसूनयावरविरोधकांनीसडकूनटीकाकेलीआहे. अशातचआताराष्ट्रवादीशरदपवारगटाच्याखासदारसुप्रियासुळेंनीही (Supriya Sule)टीकाकेलीआहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी थेट हात जोडत राम कृष्ण हरी म्हटलंय. (Supriya Sule on Bhagat Singh Koshyari)
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या काळात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्यकेलंहोतंहे आपल्याला माहिती आहे. आमच्यासाठी हे त्रासदायक आहे. शिवाय या कटू आठवणी कायम मनात राहतील. अशाशब्दातसुप्रियासुळेंनीप्रतिक्रियादिलीय.
Supriya Sule on Devendra Fadnavis : दावोसला जाण्याबाबत हरकत नाही, पण जगात जे सुरू आहे त्यामुळे मला चिंता
सगळ्याच राज्याचे मुख्यमंत्री दावोसला जात असतात. नेमकं आपल्या राज्याच्या पदरी काय पडलं? हे पाहण महत्वाच आहे. कारण मागच्या वर्षी जे करार झाले त्याच पुढे काय झालं? किती गुंतवणूक झाली? किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? हे पाहण महत्वाच आहे. दावोसला जाण्याबाबत माझी हरकत नाही. मात्र जगात जे सुरू आहे त्यामुळे मला चिंता वाटत आहे. जगातील काही देशांची काय परिस्थिती झाली हे सगळ्यांच्या समोर आहे.
Supriya Sule on Elections: काही ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस, तर काही ठिकाणी घड्याळ
राज्यात 12 जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे, काही ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस, तर काही ठिकाणी घड्याळ चिन्हावर लढत आहेत. आम्ही याबाबत स्थानिक नेत्यांवर जबाबदारी टाकली आहे. आता कराडला सगळे तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावर सगळे आहेत. काही ठिकाणी घड्याळ चिन्हावर लढत आहेत, एक वेगळं मॉडल आम्ही केलं आहे. अशीप्रतिक्रियाहीसुप्रियासुळेंनीदिली.
Sanjay Raut : महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहावर अवमानकारक टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान! असं ट्वीट करत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
