Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे कोणाच्या हातात जाणार, यावरुन वाद

Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवार यांचं पार्थिव समोर असताना तेथे उपस्थित असलेले काहीजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा करत होते. अजितदादांच्या मृत्यूच्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची घाई कोणाला आणि कशासाठी झाली होती?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर ताबा मिळवायचा असल्याचे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर देताना अजितदादांच्या पार्थिवासमोरच काहीजण दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा करत असल्याचे सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केले. (Maharashtra Politics news)
पुरोगामी महाराष्ट्रात दहावा आणि बारावा हा एक विचार आहेच. कारण तो हिंदू धर्माच्या परंपरेपासून आला आहे. पण अनेक वेळेला तीन दिवसांनंतरही अनेक कुटुंबामध्ये हे विधी संपतात. हे प्रश्न जे आम्हाला विचारत आहेत विलिनीकरणाची चर्चा दादांचा मृतदेह अंत्यदर्शनाला पहिल्या दिवशी ज्यावेळी ठेवले त्या वेळेपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू करण्याची घाई का झाली? तर एक नाही तर सात-आठ नेत्यांनी मुलाखतीचा सपाटाच लावला. दादांची अंतिम इच्छा आहे, या तारखेला त्या तारखेला विलिनीकरण होणार होते. जे विलिनीकरणाची चर्चा करत होते त्यावेळी कुणाच्या तोंडात कधी तरी आले का की आता उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे सुनेत्रा वहिनींनी हातात घ्यावीत. का नाही आले त्यांच्या मनात? विलिनीकरणाची चर्चा करत बसले आपण. दादांची अंतिम इच्छा म्हणून बोलत राहिलात, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
या मुलाखतीत सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी वेगळं होण्यामागील कारणंही सांगितली. ते म्हणाले की,'अजितदादांची 2014 पासून भाजपसोबत जाण्याची इच्छा होती. ती त्यांनी अनेकवेळा स्पष्टपणे बोलून देखील दाखवली. त्यांनी 2019 ला देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेऊन कृतीमधूनही हे दाखवले होते. 2023 मध्ये पक्षाचे दोन भाग का झाले कारण आम्ही एनडीएमध्ये गेलो म्हणून झाले. एनडीए म्हणजे कोण भाजप आणि मित्रपक्ष. भाजपसोबत आम्ही गेलो ही भूमिका आवडली नाही, त्यामुळे दोन पक्ष झाले. त्यामधून निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, न्यायालयीन प्रक्रिया झाली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ दादांच्या नेतृत्वाखालचा असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. घड्याळ चिन्ह देत सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली, हे सुनील तटकरे यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा
























