एक्स्प्लोर

Sunil Tatkare on Suraj Chavan : 'मारकुट्या' सूरज चव्हाणांची नियुक्ती का केली? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सगळंच सांगितलं; म्हणाले...

Sunil Tatkare on Suraj Chavan : अवघ्या एका महिन्याच्या आतच सुरज चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

Sunil Tatkare on Suraj Chavan : विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान रमी खेळणारे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मात्र, अवघ्या एका महिन्याच्या आतच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री छगन भुजबळ, आमदार आदिती तटकरे, नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत सुरज चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावरून छावा संघटनेसह विरोधकांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे? 

सुनील तटकरे म्हणाले की, घटना कशामुळे घडली? त्याबद्दलच्या प्रतिक्रिया मी आधी दिल्या आहेत. त्या घटनेचा आम्ही निषेधही केला आहे. त्यांना घडलेल्या घटनेबदल शिक्षा दिली आहे. सूरज चव्हाण आमच्या सोबत काम करत आहेत. पण, त्यांच्यावर आता योग्य ती जबाबदारी दिली आहे. प्रत्येकाला टीकाटिपण्णी करण्याचा अधिकार आहे. पक्षाने योग्य तो निर्णय घेतला आहे. प्रत्येक संघटनेला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी कधीही राजकीय दृष्ट्या टीकाटिपण्णी करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

ध्वजारोहणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला

दरम्यान, राज्यात एकीकडे रायगड (Raigad)आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला असताना स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2025) कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार, यावरून देखील नाराजीनाट्य रंगल्याच्या चर्चा आहे. अदिती तटकरे यांना रायगडमधून आणि गिरीश महाजन यांना नाशिकमधून ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी यावरून सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता यावर सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे.  मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड आणि नाशिकचा निर्णय घेतील. ध्वजारोहणाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. टीका जरी झाली तरी मी यावर बोलणार नाही. आघाडी-युतीचे सरकार असतात तेव्हा अशा गोष्टी होत असतात, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Vijay Ghadge On Suraj Chavan: अजित पवारांच्या शब्दाला पक्षातच किंमत नाही, तटकरेंना फिरु देणार नाही, सूरज चव्हाणच्या नियुक्तीने छावा संघटना पुन्हा आक्रमक

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत, मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले गुलबाराव पाटील? 
कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत, मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले गुलबाराव पाटील? 
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Embed widget