Sunil Tatkare On Rohit Pawar: अजित पवारांचा घातपात, रोहित पवारांचा संशय; सुनील तटकरे म्हणाले, माझं नाव कुठे...
Sunil Tatkare On Rohit Pawar: रोहित पवारांच्या आरोपावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार आणि नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sunil Tatkare On Rohit Pawar: अजित पवारांचा घातपात की अपघात (Ajit Pawar Death) असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे सवाल रोहित पवारांनी विचारले. (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला. कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार आणि नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे काय काय म्हणाले? (Sunil Tatkare On Rohit Pawar)
भारत सरकारने अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करून देशासमोर ही भूमिका मांडावी ह्या संदर्भातील मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तसेच अपघाताच्या संशयाबाबत पुरावे द्या, असंही सुनील तटकरे म्हणाले. युरोपीयन कंपनीकडे तपास दिला होता का? कुणी फोन केला? ते मला माहिती नाही. त्यांनी कुणाचा फोन गेला, काय गेला, तपास यंत्रणांमध्ये कोण नेमत असतं त्याची माहिती ते जाणकर असल्याने त्यांच्याकडे अधिक माहिती असेल, असं म्हणत सुनील तटकरेंनी रोहित पवारांना टोलाही लगावला. रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा. तर मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ ही 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती. ती भेट पावणे सात वाजता संपली. ती भेट तीन दिवस आधी ठरली होती. कारण दोन दिवस अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर होते, मी रायगडच्या दौऱ्यावर होतो, असं स्पष्टीकरणही सुनील तटकरेंनी दिलं.
...तर आज अजितदादांचा अपघात झालाच नसता हे नक्की- रोहित पवार (Ajit Pawar Plane Crash)
आतापर्यंत 13-14 दिवसात काहीही तपास झाला नाही. याचा फक्त सीसीटीव्ही गोळा केला, पण त्यावर काहीही झालं नाही. त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काहीही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे. बारामतीत ILS सिस्टिम नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. या आधी याच कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपूर्वी त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का? तसं जर झालं नसतं तर आज अजितदादांचा अपघात झालाच नसता हे नक्की. या व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही.
अजितदादांचा दौरा का बदलला, पायलट का बदलले? हा घातपात? रोहित पवारांचे अनेक प्रश्न, VIDEO:
संबंधित बातमी:
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
























