एक्स्प्लोर

Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sunil Tatkare: पार्थ पवारांनी संघटनेच्या कामाची चर्चा केली तरी... फडणवीस-पार्थ पवार भेटीबाबत तटकरे नेमकं काय म्हणाले? मला या भेटीत काही वावगं वाटत नाही.

Sunil Tatkare and Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए आघाडीत सामील होणार आणि जयंत पाटील यांना राज्याचे अर्थमंत्रीपद मिळणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे. त्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने या चर्चेला आणखीनच बळकटी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भेटीमागे कोणतेही वेगळे राजकीय समीकरण असेल, असे वाटत नाही. जयंतराव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी आहेत. ते सातवेळा विधिमंडळातून निवडून आले आहेत. त्यांनी दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व केले आहे. ते मुख्यमंत्र्यांना वेगळ्या कारणासाठी भेटू शकतात. मला या भेटीत काही वावगं वाटत नाही.  शरद पवार हे गेली अनेक वर्षे राज्य आणि केंद्रातील राजकारणाचा प्रमुख घटक राहिले आहेत. त्यांचा पक्षही राष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या पक्षाला त्यांच्या पद्धतीने वाटचाल करण्याचा आणि कोणासोबत जायचे हा निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maharashtra Politics news)

यावेळी सुनील तटकरे यांनी जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनुषंगाने घडत असलेल्या राजकीय घडामोडींविषयी सविस्तर भाष्य केले. एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते अमित शाह यांना भेटल्याची चर्चा आहे. यावर आपले मत काय असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारला असता त्यांनी म्हटले की, मला स्वत:ला वाटतं की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपद उत्तम पद्धतीने भुषविले आहे. ते इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये, असं बोलतील हे मला स्वत:ला वाटत नाही. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पद्धतीने राजकारण करणारे नेते आहेत. मित्रपक्षाला काय मिळावं, मिळू नये, असे ते मला बोलल्याचं गेल्या तीन वर्षांमध्ये मला कधी जाणवले नाही. ते जे पाऊल उचलतात, त्याला यश मिळते. ते  त्यांचे कर्तृत्व त्या पद्धतीने दाखवतात. राष्ट्रवादीशी सौहार्दाचे संबंध आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

यावेळी सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थखात्यावरील दावा पुन्हा एकदा सांगितला. अर्थखातं राष्ट्रवादीला मिळावे, ही आमची मागणी आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. ती भेट झाल्यावर आम्हाला इतर बाबींवरही चर्चा करायची आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले. पवार साहेबांच्या पक्षातील सहकाऱ्यांच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चा आहेत. पण मला याबाबत माहिती नाही. शेवटी सहा दशकं केंद्र आणि राज्याच्या राजकारणात पवार साहेबांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या पक्षाला त्यांच्या पद्धतीने वाटचाल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या पक्षाने कोणासोबत जावे, हा त्यांचा प्रश्न आहे, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.

Sunil Tatkare and Parth Pawar: पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर तटकरे काय म्हणाले?

सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेऊन तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. यानंतर बुधवारी रात्री पार्थ पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत इथून पुढे घटकपक्षातील कोणत्याही नेत्याची भेट घेताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कळवले जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत सुनील तटकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले की, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, ते संसदेतील खासदार आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांना भेटू शकतात. त्यामध्ये वावगं वाटण्याचं कारण नाही.  ते प्रशासकीय कामासोबत संघटनेच्या कामाची चर्चा करत असले  तरी वेगळं वाटण्याचं कारण नाही, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत कोल्हापूर ते मुंबई एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत कोल्हापूर ते मुंबई एकत्र प्रवास!
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Embed widget