Sunil Tatkare : अजित पवार अर्थमंत्री असताना शिस्तीने अर्थ खात सांभाळलं, आपत्ती काळात तात्काळ आर्थिक मदत केली असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या अर्थ खात्याच्या कारभारावर खासदार सुनिल तटकरेंनी (Sunil Tatkare) अप्रत्यक्ष टीका केली आहे. शेतकऱ्यांना अपुऱ्या आर्थिक मदतीवर बोलताना तटकरेंनी हे वक्तव्य केलं. अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचेही सुनील तटकरे म्हणाले. शेतकऱ्याला अग्रीम मदत अपुरी आहे. वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही सुनील तटकरे म्हणाले. 

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखात मिळावं 

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखात मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. दिवंगत अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी आपत्ती काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत शिस्तीत अर्थ खात सांभाळले होते, असं म्हणत सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत असलेल्या अर्थ खात्याच्या कारभारावर टीका केली. राज्य सरकारने अग्रीम मदत देऊ केलेली पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर शेतकरी टीका करत आहेत. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, ही मदत वाढवावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. सुनील तटकरे धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दिवाळी गोड करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेवरून आता विरोधकांनी सरकारला चांगलच घेरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका होत आहे. 

दिवाळीच्या आधी तातडीची आर्थिक मदत म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये मिळणार

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी गेल्या 25 वर्षात राज्यात नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर होत होता. त्यानंतर शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मदत करण्यात येत होती. आपण यावेळी लवकर दुष्काळ जाहीर केला आहे. आपण यंदा दुष्काळाचा जीआर ऑक्टोबरमध्येच काढला. आज सप्लीमेंटरी जीआर काढला आहे. 12 योजना लागू केल्या आहे. आता दिवाळी येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अडचणीची आहे. त्यावर आम्ही मोठा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Continues below advertisement